Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
राज्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेची (Shivsena And MNS) आज अधिकृतरित्या युतीची घोषणा होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसह इतर सात महापालिकामध्ये ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळेल. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटप ठाकरेंच्या शिवसेनेने आणि मनसेने (Shivsena And MNS) पूर्ण केल्यानंतर आज युतीची अधिकृत घोषणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे, आणि शिवसेना ठाकरे गटाचा नेमका जागा वाटपाचा फॉर्मुला काय असणार? कोण किती जागा लढवणार? मित्र पक्षांना किती जागा देणार...? असे अनेक उपस्थित झालेले प्रश्न लवकरच सुटण्याची शक्यता आहे. अशातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेचं मोठा भाऊ असणार आहे.(Shivsena And MNS)
Shivsena UBT: नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा करणार आहेत. या घोषणेआधीच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या युती संदर्भात बैठका पार पडल्या असून कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले आहे. नाशिक महापालिकाच्या 122 जागापैकी 72 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर 50 जागा मनसेकडे राहण्याची शक्यता आहे, यात माकप, वंचित, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी बोलणी सुरू आहे, त्यामुळे या जागा वाटपात मित्र पक्षांना सामावून घेतल्यानंतर त्यांना किती जागा दिल्या जातात त्यानुसार फॉर्म्युलात बदल होणार आहे. तर काँग्रेस आणि मनसे या दोघांमध्ये वाकयुद्ध रंगल्यानं काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. 2017 नाशिक महापालिकाची निवडणूक झाली होती





















