CoWin Portal News : कोविन पोर्टलवरून डेटा लीक? आरोग्य मंत्रालयाकडून महत्वाची माहिती... जाणून घ्या नेमकं प्रकरण काय..
CoWin Portal News : Co-Win पोर्टलमध्ये जमा केलेला डेटा ऑनलाईन लीक झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. याच दाव्यावर आता आरोग्य मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
CoWin Portal News : दिवसेंदिवस महाराष्ट्रासह जगभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. या जीवघेण्या कोरोनाव्हायरसच्या तिसऱ्या लाटेदरम्यान, 'कोविन' (CoWin) पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला होता. याच आरोपांना फेटाळून आता केंद्र सरकारकडून माहिती समोर आली आहे. 'कोविन' पोर्टलवरून कोणताही डेटा लीक झालेला नाही. तसेच, या दरम्यान घेण्यात आलेल्या सर्व नागरिकांची संपूर्ण माहिती सुरक्षित आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
कोविन CoWin पोर्टलमध्ये जमा केलेला डेटा ऑनलाइन लीक - रिपोर्ट्सनुसार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, डिजिटल प्लॅटफॉर्म 'कोविन' पोर्टल एखाद्या व्यक्तीचा पत्ता किंवा कोविड-19 लसीकरणासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीचे निकाल गोळा करत नाही. एका निवेदनात मंत्रालयाने म्हटले आहे की, "अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की को-विन पोर्टलमध्ये गोळा केलेला डेटा ऑनलाइन लीक झाला आहे."
कोणताही डेटा लीक झालेला नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण सत्यतेची चौकशी करेल असं केंद्रीय मंत्रालयाने म्हटलं आहे. कारण कोविड-19 लसीकरणासाठी RT-PCR चाचणीचे निकाल किंवा कोविड-19 लसीकरणासाठी नागरिकांचा पत्ता जमा करून त्यांची वैयक्तिक माहिती या माध्यमातून घेतली जात नाही. त्यामुळे "कोविन पोर्टलवरून कोणताही डेटा लीक झालेला नाही. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व डेटा सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे," असे आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. तसेच सर्व नागरिक या कोविन पोर्टलचा सुरक्षित वापर करू शकतात असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत महत्वाची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Police : ट्राफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात एका पोलिसाचीच हायकोर्टत जनहित याचिका
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
- सार्वजनिक सुट्टी मागणं हा नागरीकांचा कायदेशीर अधिकार नाही : हायकोर्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )