Weight Loss Tips : तुमचं वजन वाढण्यास या गोष्टी कारणीभूत; हेल्दी समजून 'या' पदार्थांचं सेवन करणं टाळा
Weight Loss Tips : अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंतर हेल्दी वाटतात पण प्रत्यक्षात त्या अनहेल्दी असतात.
Weight Loss Tips : अनियंत्रित होऊन वजन वाढणं (Weight Loss Tips) यामुळे मोठापा निर्माण होऊ शकतो. ही एक अशी वाईट परिस्थिती आहे जी दुसऱ्या वाईट आजारांना देखील आमंत्रण देऊ शकते. कार्डियोवॅस्कुलर आजार, डायबिटीस मेलिटस, फॅटी लिव्हर, नसांमध्ये दुखणं यांरख्या समस्या तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
अनहेल्दी मार्गाने वजन वाढण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंतर हेल्दी वाटतात पण प्रत्यक्षात त्या अनहेल्दी असतात. नुकत्याच झालेल्या अभ्यासात असं समोर आलं आहे की, फ्रूट ज्यूस प्यायल्याने वजन वाढतं. लहान मुलांमध्ये तर याचा वाढता धोका आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
फ्रूट ज्यूस प्यायल्याने वजन वाढतं?
जामा पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असा अभ्यास करण्याता आला आहे. यामध्ये टोरॅंटो आणि बोस्टनच्या संशोधनकर्त्यांनी असं म्हटलंय की जे लोक रोज 100 टक्के फ्रूट ज्यूस पित असतील तर अशा लोकांमध्ये वजन वाढण्याचं प्रमाण झपाट्याने वाढते. वजन वाढण्याचा हा परिणाम मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतो.
फ्रूट ज्युसमुळे वजन कसं वाढतं?
काही फळांमध्ये फ्रॅक्टोज नामक नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. यामुळे तुमची दिवसातील कॅलरी इनटेक वाढवते. याचा जर वापर झाला नाही तर आपलं शरीर या कॅलरीज शरीरात साठवून राहतात. त्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊन वजन वाढू लागतं. पण व्हिटॅमिन आणि मिनरल्समुळे लोक या गोष्टीकडे सहज दुर्लक्ष करतात.
फ्रूट ज्यूस प्यायल्याने तुम्हाला काही व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तर शरीराला मिळतात पण यामधून तुम्हाला फायबर नाही मिळत. फायबर ही फळांची सर्वात मोठी ताकद असते. जी ब्लड शुगरला रेग्युलेट करण्यास मदत करते. तसेच, यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते तसेच तुमचं वजन देखील नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
वजन नियंत्रित करण्यासाठी 'हे' काम करा
- प्रत्येक आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटं व्यायाम करा.
- ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करा.
- गोड आणि आर्टिफिशियल साखरेच्या पदार्थांपासून दूर राहा.
- फॅन्सी आणि क्रॅश डाएट फॉलो करू नका.
- अवेळी आहार घेऊ नका.
- गरजेपेक्षा थोडं कमी जेवण करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : तुमच्या 'या' सवयींमुळे पाठदुखीची समस्या वाढू शकते; सुटका मिळवण्यासाठी 'हे' व्यायाम करा