एक्स्प्लोर
वायरल चेक: खरंच कांद्याच्या रसाने केस येतात का?
यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात 20 दिवसात केस पुन्हा उगवण्याचा दावा केला जातोय. काय आहे या दाव्याची सत्यता? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट –
मुंबई: भारतात बहुतांश लोक हे केस गळतीच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. लाखो रुपये खर्च करुनही कोणताच फायदा होत नाही. पण यूट्यूबवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यात 20 दिवसात केस पुन्हा उगवण्याचा दावा केला जातोय. काय आहे या दाव्याची सत्यता? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट –
कांद्याच्या रसाने 20 दिवसात केस उगवणार? कांद्याचा रस केसांना लावण्याने टक्कल पडणार नाही? लाल कांद्याच्या रस केसांसाठी अमृत? असे अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर शोधण्यात अनेकांचे केस गेले.
केसांची गळती थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च करुनही कोणताच फायदा होत नाही. अशाच लोकांना भुलवणारा एक दावा सोशल मीडियावर केला जातोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज काय आहे?
लाल कांदा उकळून त्याचा रस केसांना लावला तर 20 दिवसांच्या आत केस गळणं पूर्णपणे थांबेल. नवीन केस येऊ लागतील. लाल कांद्यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स असल्यांनं ते केसांसाठी फायदेशीर ठरतात, असा हा मेसेज आहे.
पण सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा खरा नसल्याचं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कांद्याचा रसामुळे कोणत्याही प्रकारे 20 दिवसात केस येणं शक्य नाही, असं तज्ज्ञ सांगतात.
हे झालं त्वचारोग तज्ज्ञांचं म्हणणं पण आयुर्वेदात लाल कांद्याच्या रसाचं काही महत्व सांगितल गेलंय का?
आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात – कांद्याच्या रसाने नुकसान होणार नाही, पण त्याने फायदाही होणार नाही.
त्वचारोग आणि आयुर्वेद तज्ज्ञांनुसार कोणत्याही प्रकारे 20 दिवसांत केस उगवणं शक्य नाही. उलट अशाप्रकारे तज्ज्ञांचा सल्ला न घेता उपाय करणं नुकसान देणारचं ठरेल.
त्यामुळे लाल कांद्याचा रस लावल्यामुळे 20 दिवसात केस उगवण्याचा दावा खोटा ठरला आहे.
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement