(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Urfi Javed : उर्फी जावेद 'laryngitis' या आजाराने त्रस्त; काय आहे हा आजार? वाचा सविस्तर
Urfi Javed diagnosed with Laryngitis : दुबईमध्ये उर्फीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक तपासण्या केल्यानंतर तिला 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) झाल्याचे कळले.
Urfi Javed diagnosed with Laryngitis : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. अनेकदा ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. मात्र, यावेळी कोणत्याही फॅशन सेन्समुळे नाह तर तिच्या तब्येतीमुळे ती चर्चेत आहे. उर्फी सध्या दुबईत आहे. दुबईच्या हॉस्पिटलमधील उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फी जावेद सध्या दुबईत आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांमध्ये फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. दरम्यान, उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. जी वाचल्यानंतर तिचे चाहते क्षणभर अस्वस्थ होऊ शकतात. उर्फीने सांगितले की, दुबईला पोहोचताच त्याला त्याच्या 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) या आजाराची माहिती मिळाली. त्यामुळे तिला दुबईत नीट फिरता आले नाही. सध्या तिला आराम करण्यास सांगितले आहे. बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फीने चाहत्यांसाठी एक पोस्ट लिहिली- 'माझा अर्धा खर्च तर या आजारातून बरा होण्यात खर्च झाला'.
उर्फीची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल
दुबईमध्ये उर्फीची तब्येत बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक तपासण्या केल्यानंतर तिला 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) झाल्याचे कळले. सध्या दुबईत तिच्या आजारावर उपचार सुरु आहेत. मात्र, तिला बोलण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
'लॅरिन्जायटीस' (laryngitis) म्हणजे काय?
लॅरिन्जायटीस हा गंभीर आजार नाही. 'लॅरिन्जायटीस' (laryngitis) म्हणजे घशात होणारी जळजळ, सूज येणे आणि इन्फेक्शन. जर हा त्रास जास्त वाढला तर तुमचा आवाज हळूहळू खराब होऊ लागतो. इतका की, तुमचा आवाज जवळजवळ ओळखता येत नाही. हा आजार गंभीर नाही, पण त्यावर योग्य वेळी उपचार घेतले नाही तर गंभीर समस्य उद्भवू शकते.
2015 मधील टेडी-मेडी फॅमिली या मालिकेमधून उर्फीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :