Tulsi leaves Benefits : अंगणातील एक तुळस ठेवते अनेक आजारांपासून दूर; वाचा तुळशीचे आश्चर्यकारक फायदे
Tulsi leaves Benefits : तुळस केवळ धार्मिकदृष्ट्याच महत्त्वाची नाही, तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत.
Tulsi Leaves Benefits : तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. वेगवेगळ्या उत्सवात तुळशीची पूजा विधीपूर्वक केली जाते. हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांच्या घराबाहेर तुम्हाला तुळशीचे रोप नक्कीच दिसेल. केवळ धार्मिक दृष्टिकोनातून ही वनस्पती महत्त्वाची नाही तर आयुर्वेदातही या वनस्पतीचे शरीरासाठी फायदेशीर वर्णन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळातही लोकांनी तुळशीचे सेवन करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवली. तुळशीच्या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे शरीराला विविध फायदे देतात.
जर तुम्ही दररोज चार तुळशीच्या पानांचे सेवन केले तर तुम्ही अनेक सामान्य आजारांपासून दूर राहू शकता. तुळशीच्या वनस्पतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात ज्यामुळे ते आणखी खास बनते. हे गुणधर्म शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. तुळशीच्या रोपामुळे घरातील वातावरण तर सुधारतेच, पण ते शरीराला आतून मजबूत करते.
रोज तुळशीची चार पाने खाल्ल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.
हृदयविकारांपासून दूर राहा
रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळेल : तुळशीच्या पानांमुळे पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते. ते डायरियाची समस्या थांबवण्याचेही काम करतात.
हाडांना मजबूती मिळते : तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फोलेट सारखे पोषक तत्व आढळतात जे आपली हाडे मजबूत करतात.
किरकोळ आजारांपासून सुटका : तुळशीची पाने सर्दी आणि इतर किरकोळ समस्या दूर ठेवतात. तुळशीची पाने चहामध्ये टाकून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. तुळशीची पाने केवळ थंड वातावरणात शरीराला उबदारपणा देत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.
कर्करोग टाळण्यास मदत होते : तुळशीची पाने कॅन्सरसारख्या भयंकर रोगापासून बचाव करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची चार पाने खाल्ल्याने त्वचा, यकृत, तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.
श्वासाची दुर्गंधी दूर करते : आपल्या तोंडाच्या आरोग्यासाठीही तुळशीची पाने उत्तम आहेत. हे दात आणि हिरड्या मजबूत करण्याचे काम करते. तसेच श्वासाची दुर्गंधी दूर करते.
शरीराला डिटॉक्स करतात : तुळशीची पाने आपल्या शरीराला डिटॉक्स करतात. यात लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी कमी होते जे किडनी स्टोन तयार होण्याचे मुख्य कारण आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :