Health Tips : खाण्यापिण्याच्या ‘या’ सवयींमुळे लिव्हर होईल खराब! वेळीच सावध व्हा!
Liver Health : चुकीच्या आहारामुळे आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे यकृताचे आजार आणि इतर समस्या सुरू होतात. तेलकट, जंक फूड आणि फॅटयुक्त पदार्थांच्या सेवनाने देखील यकृताचे आजार सुरू होतात.

Food That Can Damage Liver: ‘लिव्हर’ अर्थात यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. चुकीच्या आहारामुळे आणि आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे यकृताचे आजार आणि इतर समस्या सुरू होतात. तथापि, यकृताशी संबंधित आजारांसाठी केवळ चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा चुकीची जीवनशैली जबाबदार मानली जात नाही. पण, यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात.
तेलकट, जंक फूड आणि फॅटयुक्त पदार्थांच्या सेवनाने देखील यकृताचे आजार सुरू होतात. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या यकृताला हानी पोहोचवू शकतात. चला तर, जाणून घेऊया...
जंक फूड्स
आजच्या काळात लोक जंक फूडचे जास्त सेवन करत आहेत. जंक फूडचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, पण ते लठ्ठपणासाठीही जबाबदार मानले जातात. यामुळे, यकृताला गंभीर नुकसान होऊ शकते आणि लिव्हर सिरोसिस हा आजार होतो. लिव्हर सिरोसिसमुळे तुम्हाला यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जंक फूडच्या सेवनापासून दूर राहावे.
सोडा आणि इतर पेये
सोडा आणि इतर कार्बोनेटेड पेये यकृताच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात, ज्यामुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. त्याचबरोबर हे कार्बोनेटेड पेये लठ्ठपणाची समस्या वाढवण्यासही हातभार लावतात.
रिफाईंड प्रोडक्ट
साखर, तेल आणि मैदा यासारखे रिफाईंड प्रोडक्ट यकृतासाठी हानिकारक मानले जातात. हे पदार्थ शरीरात कर्करोगाच्या समस्या वाढवण्याचे काम करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा :
- Skin Care Tips: मुलायम आणि चमकदार त्वचा हवीये? वापरा अॅप्पल फेस पॅक, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
- Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार
- Weight Loss : पांढऱ्या पदार्थांमुळे वाढते वजन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























