एक्स्प्लोर

मोदीजी हा उत्तर कोरिया नाही भारत आहे, जेव्हा सत्ता स्वत:ला राष्ट्र आणि मतभेदाला दुश्मन समजते तेव्हा लोकशाही मरते; राहुल गांधींचा सडकून प्रहार

Rahul Gandhi on PM Modi: राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना विविध आंदोलनांचा उल्लेख केला आणि सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

Rahul Gandhi on PM Modi: "आजच्या भारतात शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवणे हा सर्वात मोठा 'गुन्हा' बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला अशा दिशेने ढकलले जात आहे, जिथे प्रश्न विचारणे हा कट मानला जातो आणि मतभेद व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह," अशा तीव्र शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवल्यानंतर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे.  राहुल गांधी यांनी थेट इशारा दिला आहे की, संवैधानिक मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना आज तुरुंगवास आणि खटल्यांना सामोरे जावे लागत आहे. एका "तडजोड केलेल्या" पंतप्रधानांच्या राजवटीत जनतेची गैरसोय टाळण्यासाठी न्यायाची मागणी फेटाळून लावली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तरुणांपासून कुस्तीगीरांपर्यंत, सर्वांचाच आवाज दाबला!

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना विविध आंदोलनांचा उल्लेख केला आणि सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये काही प्रमुख घटनांचा दाखला देत सरकारला धारेवर धरले. राहुल यांनी म्हटलं आहे की, भविष्याची चिंता करणाऱ्या तरुणांनी जेव्हा पेपर लीक प्रकरणावर आवाज उठवला, तेव्हा त्यांना न्यायाऐवजी पोलिसांच्या लाठ्या मिळाल्या. देशाची शान असलेल्या महिला कुस्तीगीरांनी जेव्हा भाजपच्या एका प्रभावी नेत्याविरुद्ध गंभीर आरोपांची चौकशी मागितली, तेव्हा त्यांना न्याय देण्याऐवजी आंदोलनाला बदनाम करण्यात आले आणि त्यांना रस्त्यावरून ओढत नेले गेले.
'प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे का?'

आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना 'राष्ट्रविरोधी' ठरवण्यात आले. संवादाऐवजी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या, रबर गोळ्या आणि पाण्याचा मारा करण्यात आला. राहुल गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न, पर्यावरणीय समस्या आणि युथ काँग्रेसच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. "जेव्हा आदिवासी जमीन आणि जंगलासाठी लढतात, तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. जेव्हा लोक प्रदूषणाविरुद्ध बोलतात, तेव्हा त्याला 'राजकारण' ठरवून दाबले जाते. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे जिथे पंतप्रधान प्रश्नांना घाबरतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तेव्हाच लोकशाही मजबूत 

"शांततापूर्ण निषेध हा गुन्हा नाही, तो लोकशाहीचा आत्मा आहे. प्रश्न विचारणे ही लोकशाहीची कमकुवतपणा नाही, तर ती तिची ताकद आहे. जेव्हा सरकार टीका ऐकते आणि जबाबदार राहते, तेव्हाच लोकशाही मजबूत होते." असंही त्यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
मेडिकलच्या विद्यार्थीनीने जीवन संपवलं; राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध गुन्हा, अ‍ॅटॉसिटीचेही कलम लावले
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
पुण्यात गॅस टंचाईचा फटका; वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद, अमेरिका-इराण युद्धाचा फटका
Nanded Crime News: नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
नांदेडमध्ये 25 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Embed widget