एक्स्प्लोर

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल पटेल यांची घोषणा

पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

मुंबई : अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झालं. अजित पवारांमुळे (Ajit pawar) राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

अजित दादा 28 जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेले, आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सर्वाना प्रश्न होता उद्या आपण काय करणार, कसं करणार? पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

मागच्या महिन्यात आपण पाहिलं की, काहीजण बोलू लागले. आपल्या पक्षात काही संबंध नाही ते काहीही बोलायला लागले, आम्ही काय करायचं ते सांगायला लागले. पोटात एक आणि ओठात एक बोलू लागले. परंतु आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. आपण योग्यवेळी योग्य निर्णय केला. आता, आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचं आहे. आता आपण नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आपली वाटचाल करणार आहोत. आपण सर्वजण याठिकाणी एकत्र आलो आहोत. सगळ्या प्रांतातील लोकं याठिकाणी आले आहेत, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली. 

अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं होतं. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला होता. पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केलं. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ मुश्रीफ आमची सर्वांची जबाबदारी होती आपला पक्ष आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत. मी 35 वर्ष अजित पवारांचा मित्र म्हणून आज घोषणा करत आहे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल जावं, असा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. त्यानंतर, सर्वांनी हात उंचावत सहमती दर्शवली. तसेच, मी घोषणा करतोय की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे, असे पटेल यांनी जाहीर केले.

अजित पवारांची आठवण 

अजित पवार एका वेगळ्या मातीचेच बनले होते, आपल्यावर अनेक संकटे आली. अजित पवारांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला प्रश्न पडला होता आता आपण पुढे कसं जाणार आहोत. मात्र, अजित पवारांनी कधीही आपला निश्चय कमी होऊ दिला नाही. शेवटी नेता तोच असतो जो लढाईमध्ये पुढे येऊन लढाई लढतो आणि त्यानुसार त्यांनी लढाई लढली, जिंकली. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांना माहिती आहे की, अजित पवारांबाबत काय भावना होती आणि आता नाहीत त्यावेळी काय आहे. सुनेत्रा पवार ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाल्या त्यावेळी आम्ही संसदेत गेलो त्यावेळी सगळेजण येऊन भेटत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, अशी आठवण प्रफुल पटेल यांनी सांगितली.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget