एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लहान वयात आत्महत्येचा प्रयत्न भविष्यात धोकादायक
मुंबई : ज्यांनी किशोर वयात आत्महत्येचा प्रयत्न केला असेल, त्यांना भविष्यात ह्रदय रोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एका नव्या संशोधनाने हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.
अमेरिका विद्यापीठातील नॉर्थ कॉरेलिनाच्या सहाय्यक प्राध्यापिका लिली शानाहन यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. त्यांना आपल्या संशोधनादरम्यान काही धक्कादायक निष्कर्ष आढळले आहेत. " किशोर वयात केलेला आत्महत्येचा प्रयत्न, हा मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. पण त्याचा हा प्रयत्न भविष्यात गंभीर रोगांना आंमत्रण देणारा ठरू शकतो, " असे त्या संशोधनाची माहिती देताना म्हणाल्या.
त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, किशोर वयात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला वीसाव्या वर्षापासूनच उच्च रक्तदाब, ह्रदय रोगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागतं. तसेच याच वयात कोणत्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला तर तिला लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावं लागतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
क्रिकेट
Advertisement