(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Care : उन्हामुळे त्वचा काळवंडली? वापरा हा फेस मास्क, जाणून घ्या तयार करण्याची सोपी पद्धत
तुम्ही हा फेस पॅक घरीच तयार करु शकता.
Beauty Benefits of Aloe Vera Face Mask : उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी पडू नये, यासाठी अनेक लोक स्कार्फ बांधून बाहेर फिरत असतात. काही लोक उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सन कोट देखील घालतात. पण अनेक वेळा उन्हामुळे स्किन काळी पडते. त्वचेवरील टॅन घालवण्यासाठी कोणतेही केमिकल असणारे प्रोडक्ट वापरल्यानं त्वचेच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्वचेवरील काळेपण घालवण्यासाठी तुम्ही घरीच फेस मस्क तयार करु शकता.
कोरफडचा वापर करुन तुम्ही हा फेस मास्क घरीच तयार करु शकता. कोरफडीच्या जेलमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे फोडं आणि पिगमेंटेशन कमी होते. जाणून घेऊयात कोरफड फेस मास्क तयार करण्याची पद्धत-
कोरफड फेस पॅक
एक चमचा कोरफड जेल,एक चमचा मध
लिंबू आर्धा चमचा
गुलाब पाणी- अर्धा चमचा
फेस पॅक तयार करण्याची पद्धत-
टॅन घालवण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यानंतर त्यामध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट मिक्स केल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस आणि गुलाब जल मिक्स करा. हे सर्व मिक्स केल्यानंतर कोरफड जेल तयार होईल. कोरफड जेलचा हा फेस मास्क चेहऱ्यावर लावताना चेहऱ्याचा मसाज करा. 15 मिनीट चेहऱ्यावर हा पॅक ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा. दिवसातून एक-दोन वेळा हा पॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. या पॅकमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग आणि फोडं कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :