Sankashti Chaturthi 2023 : आज 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न; चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व जाणून घ्या
Sankashti Chaturthi 2023 : वर्षातील शेवटच्या चतुर्थीला बाप्पाला प्रसन्न करण्याची अनोखी संधी आहे, संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
![Sankashti Chaturthi 2023 : आज 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न; चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व जाणून घ्या Sankashti Chaturthi 2023 marathi news Today last Sankashti Chaturthi of the year 2023 Know Tithi Muhurta Puja Method Significance Sankashti Chaturthi 2023 : आज 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी! बाप्पाला करा प्रसन्न; चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/30/fe28f114856c2ad04fde2730ee0ee9701703901514143381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sankashti Chaturthi 2023 : वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी व्रत 30 डिसेंबर रोजी म्हणजेच आज करण्यात येणार आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी होणारी ही संकष्टी चतुर्थी असेल. जीवनातील अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी आज व्रत, पूजा करतो, त्याला आयुष्यात कधीही संकटांचा सामना करावा लागत नाही. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आराधना केल्याने घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते. जाणून घेऊया बाप्पाची पूजा कशी करायची? संकष्टी चतुर्थीची तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या. संकष्टी चतुर्थीची तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या.
संकष्टी चतुर्थी 2023 तिथी
पंचांगानुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शनिवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.43 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी, 31 डिसेंबर रोजी सकाळी 11.55 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरलाच साजरी होणार आहे.
संकष्टी चतुर्थी 2023 चंद्रोदय वेळ
संकष्टी चतुर्थीला 30 डिसेंबर रोजी रात्री 9:10 वाजता चंद्रोदय होईल. आज चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि त्याशिवाय व्रत मोडत नाही.
संकष्टी चतुर्थी 2023 शुभेच्छा
वक्रतुंडा महाकाय सूर्यकोटी सम्प्रभानिर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।। संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:। नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक :।। धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:। गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय। नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
भक्ति गणपति,शक्ति गणपति,सिद्दी गणपति,लक्ष्मी गणपतिमहा गणपति,देवांमध्ये श्रेष्ठ गणपति। संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला.
त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी.
सर्वप्रथम गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी.त्यानंतर पूजेमध्ये तीळ, गूळ, लाडू, फुले, कलशात पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ प्रसाद म्हणून ठेवावे.
यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले व पाणी अर्पण करा.
त्यानंतर श्रीगणेशाला तिळाचे लाडू व मोदक अर्पण करा.
अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा.
उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका.
संध्याकाळी चंद्र उगवण्यापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sankashti Chaturthi 2023 : 2023 वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबरला!'अशी' करा पूजा, इच्छित परिणाम मिळेल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)