Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान, 5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांकडून भरभरुन दान देण्यात आलं आहे. 5 कोटी 65 लाख रुपये रोख जमा झाले आहेत.
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुंबईतील लालबागचा राजा येथील गणपती प्रसिद्ध आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येनं येत असतात. दरवर्षी गणेशोत्सवात लालबागच्या राजाला भाविक रोख रक्कम, सोने आणि चांदीच्या स्वरुपात दान करत असतात. गेल्या काही वर्षांपासून या दानामध्ये वाढ होतं असल्याचं चित्र आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदा लालबागच्या राजाचा 91 वा गणेशोत्सव 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत पार पडला. लालबागच्या राजाला होत असलेल्या दानाची मोजदाद सुरु करण्यात आली होती. या दानाची रक्कम मोजून पूर्ण झाली आहे. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी 5 कोटी 50 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. तर, चार किलोपेक्षा जास्त सोनं आणि 64 किलो पेक्षा अधिक चांदी जमा झाली आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे.भाविकांनी गणेशोत्सवातील दहा दिवसात लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रोख रुपये दान केले आहेत. 7 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर पर्यंत लालबाग राजा चरणी आलेल्या रोख रकमेची मोजदाद सुरु होती. ही मोजदाद पूर्ण झाली आहे. लालबागच्या राजाच्या गणेशाची विसर्जन मिरणूक 17 सप्टेंबरला सुरु झाली ती 18 सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपली. आता लालबागच्या राजाला मिळालेलं दान मोजून पूर्ण झालं आहे.
लालबागच्या राजाला 5 कोटी 65 लाख 90 हजार रुपयाचे रोख रकमेचे दान भाविकांनी केलं आहे. तर, 4151.360 ग्रॅम सोनं लालबागच्या राजा चरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आलं आहे. तर 64321 ग्राम चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान म्हणून अर्पण करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र त्यासोबतच लालबाग राजाच्या पदाधिकाऱ्यांकडून हे मोजदाद सुरू होती. उद्या म्हणजेच 21 सप्टेंबरला लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव केला जाणार आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून लिलाव कुठं होणार?
लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात आयोजित करण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं मंडळाकडून कळवण्यात आलं आहे.
इतर बातम्या: