(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
Lalbaugcha Raja 2024 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेला एक भाविक अगदी क्षणात प्रसिद्ध झाला आहे. अगदी तोऱ्यात वावरणारे मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा या भाविकासोबत उभे राहून फोटो काढत आहेत.
Lalbaugcha raja 2024 : मुंबईतील लालबागचा राजा देशभरात प्रचलित आहे. नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच राज्यासह देशभरातील भाविक गणेशोत्सव काळात लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक दर्शनासाठी रांगा लावतात. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे असतात.
अकराव्या दिवशी विसर्जनाच्या तयारीसाठी दर्शनाच्या रांगा बंद केल्या जातात. यंदा बाप्पाला निरोप देण्याच्या काही तास अगोदर चरण स्पर्श रांग सोमवारी, 16 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता बंद झाली आणि मुख दर्शन रांग मध्यरात्री 12 वाजता बंद झाली. यंदा मुख दर्शनाच्या रांगेत असलेला शेवटचा व्यक्ती भाग्यवान ठरला आहे. लालबागचा राजा मंगळातील कार्यकर्त्यांनी या भाविकाला VIP वागणूक दिली आणि त्याच्यासोबत फोटो काढले, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नेमकं घडलं काय?
लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी आलेला एक तरुण तासाभरापूर्वी रांगेत चेंगरा-चेंगरीमध्ये उभा होता, मात्र अगदी काही वेळातच तो VIP झाला. त्याचं झालं असं की, यंदा लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी येवला, नाशिक येथून आलेला विशाल आळणे हा मुख दर्शन रांगेतील शेवटचा व्यक्ती ठरला आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काढले विशालसोबत फोटो
लालबागचा राजाचं दर्शन बंद करण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याआधी शेवटचा भक्त म्हणून विशाल आळणे याला स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी परवानगी दिली आणि त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली. एरवी तोऱ्यात मिरवणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशालसोबत उभं राहून फोटो काढले. लालबागचा राजाचं दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या समूहामधील तो शेवटचा व्यक्ती दर्शन रांगेमध्ये प्रवेश करू शकला, म्हणून त्याला “सर्वात भाग्यवान व्यक्ती” म्हटलं गेलं.
View this post on Instagram
मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो. दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच एवढ्या लाखोंच्या गर्दीत लालबागच्या राजाचं रांगेतून दर्शन घेणारा विशाल हा शेवटचा व्यक्ती ठरला, त्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे एरवी लाखोंच्या गर्दीत मानानं वावरणारे कार्यकर्तेही या तरुणासोबत फोटो घेताना दिसले. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गेटमधून विशाल हा शेवटचा व्यक्ती आतमध्ये आला आहे. यावेळी मंडळातील सर्व कार्यकर्ते त्याच्यासोबत फोटो काढत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा: