Happy Relationship साठी 'या' 3 बाऊंड्रीज सेट करा, नातं होईल घट्ट, जोडीदाराचं वाढेल प्रेम
Relationship : जर तुम्हाला तुमचं नातं आयुष्यभर आनंदी ठेवायचं असेल, तर तुम्ही काही सीमा निश्चित केल्या पाहिजेत. जाणून घ्या.
Relationship Tips : एखाद्या नात्यात जेव्हा खूप प्रेम आणि विश्वास असतो, तेव्हा दोन्ही जोडीदार खूप आनंदी राहतात. आपल्या नात्यातील प्रेम आयुष्यभर असेच राहावे अशी अनेकांची इच्छा असते. असं म्हणतात ना, की नातं टिकवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण यासोबतच नात्यात काही सीमा असणंही खूप गरजेचं आहे. अनेकदा लोक त्यांच्या नात्यात सीमांना जास्त महत्त्व देत नाहीत. त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांच्या नात्यात किंवा जोडीदाराशी अंतर वाढेल, परंतु प्रत्यक्षात तसे नाही.
नात्यात तुमचे वेगळे व्यक्तिमत्त्व जपू शकता
तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण काही हेल्दी बाऊंड्रीज म्हणजेच काही सीमा तुमचं नातं आणखी घट्ट करतात. याच्या मदतीने तुम्हीृ रिलेशनशिपमध्ये असतानाही तुमचे वेगळे व्यक्तिमत्त्व जपू शकता. जेव्हा नातेसंबंधात या सीमा असतात, तेव्हा दोन्ही जोडीदारांना गुदमरल्यासारखे वाटत नाही आणि ते नात्यात मुक्तपणे श्वास घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी सीमांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे नाते आणखी आनंदी राहते-
दोघांच्या वेळेचा, गरजेचा आदर करा
जेव्हा निरोगी सीमांचा विचार केला जातो, तेव्हा पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या जोडीदाराला त्याची पर्सनल स्पेस देणे. हे तुम्हा दोघांना तणाव कमी करण्यास आणि तुमचे इतर नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते. अनेक वेळा जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराने सर्व वेळ त्यांच्यासोबत घालवावा असे वाटते, परंतु अशा स्थितीत नात्यात गुदमरल्यासारखे वाटू लागते. म्हणून, दोघांनीही एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा आदर करणं गरजेचं आहे. तसेच एकमेकांसोबत एकत्र दर्जेदार वेळ घालवणे आणि एकमेकांना स्पेस देणे यात संतुलन साधू शकता.
काहीही बोलण्याचा अधिकार नाही
अनेक वेळा लोकांना असे वाटते की, जर ते रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या पार्टनरला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. आपलं नातं वाचवण्यासाठी समोरची व्यक्तीही ते ऐकून घेते. मात्र, नातेसंबंधात आपण अशी बाऊंड्री सेट केली पाहिजे की कोणीही आपला स्वाभिमान दुखावू नये. निरोगी आणि आनंदी नातेसंबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही जोडीदार एकमेकांशी आदराने वागतात, एकमेकांच्या मतांची कदर करतात आणि एकत्र निर्णय घेतात.
आर्थिक सीमा
असे म्हणतात की, जिथे प्रेम असते तिथे पैशाला किंमत नसते. हे जरी खरे असले, तरीही पैसा हे बहुतेक नाती तुटण्याचे कारण आहे. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या नातेसंबंधात काही आर्थिक सीमा निश्चित करा. संपूर्ण आर्थिक भार फक्त एकाच जोडीदारावर पडू नये यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करा की तुम्ही दोघे बसून खर्च आणि बचत याबद्दल बोला. तसेच, आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. जॉइंट अकाऊंटसोबतच तुम्ही वैयक्तिक खर्चासाठी स्वतंत्र खातीही तयार करावीत. जेणेकरून तुमच्या नात्यावर दबाव न आणता तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.
हेही वाचा>>>
Relationship : काय तर म्हणे.. कधी नूडल्सवरून...कधी उशीरा उठल्यानं...एकापेक्षा एक घटस्फोटाची कारणं वाचून तुम्हालाहा बसेल धक्का!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )