Relationship : काय तर म्हणे.. कधी नूडल्सवरून...कधी उशीरा उठल्यानं...एकापेक्षा एक घटस्फोटाची कारणं वाचून तुम्हालाहा बसेल धक्का!
Relationship : वैवाहिक जीवनात घटस्फोटाची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. घटस्फोटाची अशी 5 विचित्र कारणं जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Relationship : वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास सर्वात महत्वाचा असतो. परंतु यापैकी एकही कमी होऊ लागले तर नात्याचे भविष्य धोक्यात येते. कधी कधी अशी वेळ येते जेव्हा जोडीदारांना वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागतो. घटस्फोटामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे अनुभव येतात. भारतात विवाह हा अत्यंत पवित्र बंधन मानला जातो. पण बदलत्या काळानुसार भारतातही वैवाहिक जीवनात घटस्फोटाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. बहुतेक घटस्फोट परस्पर सहमती, वैयक्तिक किंवा कौटुंबिक विवादांमुळे होत असले तरी अनेक जोडपे वेगळे होण्याची काही विचित्र कारणं देखील समोर आली आहेत, जी तुम्हालाही आश्चर्यचकित करू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशीच काही घटस्फोटाची कारणं सांगणार आहोत, जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (Reason Of Divorce)
पती महिन्यातून एक किंवा दोनदाच आंघोळ करत असल्याचे कारण
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एका महिलेने लग्नानंतर अवघ्या 40 दिवसांतच पतीकडे घटस्फोटाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि शरीरातून दुर्गंधी येत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात नवऱ्याची चौकशी केली असता, त्याने कबूल केले की तो महिन्यातून एकदा किंवा दोनदाच आंघोळ करतो आणि आठवड्यातून एकदा गंगाजल शिंपडतो. या कारणास्तव महिलेने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असला तरी समुपदेशन केंद्राने त्यांना पुन्हा बोलण्याचा सल्ला दिला आहे.
उशीरा उठल्यामुळे पतीचा पत्नीला घटस्फोट
उत्तर प्रदेशातील रामपूर भागात एका महिलेचे म्हणणे आहे की, तिच्या पतीने तिला तीनदा तलाक सांगून सोडले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्या घटस्फोटाचे कारण खूपच आश्चर्यकारक होते. गुल अफशानच्या म्हणण्यानुसार, ती सकाळी उशिरा उठली होती आणि त्यामुळे चिडलेल्या तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला.
2 मिनिट नूडल्स ठरले घटस्फोटाचे कारण
कर्नाटकातील बल्लारी येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. त्याच्या बायकोला चांगला स्वयंपाक कसा करायचा हे कळत नव्हते. इतकेच नाही तर ती त्यांच्यासाठी रोज नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी नूडल्स तयार करत असे. यामुळे तो माणूस इतका अस्वस्थ झाला की त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.
नवरा इतका गोड, प्रेमळ होता की पत्नी नात्याला कंटाळली
हे प्रकरण जेवढे विचित्र वाटते तेवढेच धक्कादायक आहे. 2020 मध्ये, उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील एका महिलेने शरिया न्यायालयात तिच्या पतीपासून घटस्फोटाची याचिका दाखल केली. तिचे कारण असे होते की तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि तिच्याशी कधीही भांडण करत नाही. महिलेने सांगितले की तिचा नवरा इतका गोड आणि प्रेमळ होता की ती या नात्याला कंटाळली होती. न्यायालयाने तिला घटस्फोट देण्यास नकार दिला असला तरी महिलेने पंचायतीमध्ये आपली बाजूही मांडली.
पत्नीने पतीच्या फोनवर पाठवलेल्या फोटोमुळे
एका व्यक्तीने आपल्या पत्नीला फोनवर पाठवलेल्या फोटोमुळे घटस्फोट दिला. खरं तर, आपल्या कंपनीच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेलेल्या या व्यक्तीने आपल्या पत्नीला पतीच्या फोनवर एक फोटो पाठवण्यास सांगितले. जेणेकरुन ती त्यावेळी काय करत होती हे समजू शकेल. पत्नीने झोपेतून उठून फोटो तर पाठवले. आधी पती फोटो पाहून खुश झाला आणि मग अचानक तो खूप रागावला आणि त्याने आपल्या वकिलाला बोलावून घटस्फोटाची केस दाखल केली. याचे कारण फोटोमध्ये दुसऱ्याचा हात महिलेच्या हाताजवळ होता, जो पत्नीने पतीला दगा दिल्याचा पुरावा आणि घटस्फोटाचे कारण बनला.
हेही वाचा>>>
Relationship Tips : जोडीदारासोबतचे वाद वेळीच मिटवा, नंतर होईल पश्चाताप! 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नात्यात निर्माण होईल दुरावा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )