Pregnancy Tips : गर्भधारणे दरम्यान त्वचा काळी का होते? वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
Pregnancy Tips : गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास खूप सुंदर असतो, पण या काळात महिलांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते.
Pregnancy Tips : गर्भधारणा (Pregnancy Tips) हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल होत असातात. हे बदल जितके हार्मोनल इनबॅलेन्समुळे असतात तितकेच ते त्वचेशी संबंधित देखील असतात. हे बदल कायमस्वरूपी नसतात. पण, जर वेळीच त्यांची काळजी घेतली तर त्यावर देखील नियंत्रण मिळवता येते.
त्वचेशी संबंधित समस्या
खरंतर, आई होण्याचा हा संपूर्ण प्रवास फारच सुंदर पण आव्हानात्मक असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या काळात बऱ्याच महिलांना हार्मोनल इनबॅलेन्समुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील निर्माण होत असतात. जसे की, पिंपल्स येणे, पिगमेंटेशन, Acne, त्वचा काळी पडणे आणि डार्क सर्कल्स येणे. हार्मोन्सची वाढलेली पातळी, विशेषत: इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन, सर्व तेलकट त्वचेला कारणीभूत ठरतात, ज्यामुळे ब्रेकआउट आणि पिंपल्स येऊ शकतात.
या काळात जास्तीत जास्त फरक दिसून येतो. सर्वात आधी ज्याला चेहऱ्याचा रंग डार्क होत जाणे याला मेलास्मा असेही म्हणतात. काही वेळा स्त्रियांच्या गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर खूप केस गळायला लागतात आणि नखांमध्ये खूप बदल होतात. याचा अर्थ असा की, नखं खूप वेगाने वाढतात आणि बऱ्याचदा पिंपल्स देखील येतात. जर, तुम्हाला पिंपल्सचा त्रास हा फार काळ जुना असेल तर गर्भधारणेतही हा त्रास तुम्हाला जाणवू शकतो.
गर्भधारणे दरम्यान स्त्रियांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल
गर्भधारणेचा प्रुरिगो, म्हणजे सतत खाज सुटणे आणि शरीरावर काही फोड आणि लाल ठिपके, ज्याला प्र्युरिटिक अर्टिकेरियल पॅप्युल्स आणि गर्भधारणेचे प्लेक्स असेही म्हणतात. या सर्वात सामान्य गोष्टी आहेत ज्या गर्भधारणेदरम्यान घडतात ज्यावर उपचार करता येतात. पण, याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. जर यावर निदान न करता किंवा उपचार न करता त्याला असेच सोडून दिले तर अनेक आरोग्यदायी समस्या उद्भवू शकतात.
या सर्वात एक गोष्ट मात्र, नक्की असते ती म्हणजे जरी महिलांना गर्भधारणेत शरीरासंबंधित, हार्मोन बदलांशी संबंधित किंवा त्वचेशी संबंधित जे काही प्रॉब्लम्स असतील ज्या काही समस्या असतील त्यापैकी बहुतेक समस्या या बाळाच्या जन्मानंतर दूर होतात. पण, काही मेलास्मा, पिंपल्स आणि केस गळती यांसारख्या समस्या प्रसूतीनंतरही कायम राहू शकतात. यासाठी महिलांनी संतुलित आहार आणि योग्य व्यायाम करणं गरजेचं आहे. पुरेशी झोप घेतल्यानेही अनेक समस्या दूर होऊ शकतात असं तज्ज्ञ सांगतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :