(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Makeup Tips : मेकअप केल्यानंतर तुम्हालाही खाज सुटते का? 'हे' असू शकतं यामागचं कारण
Makeup Tips : बाजारात अनेक प्रकारचे स्वस्त मेकअप प्रोडक्ट्स विकत घेण्याच्या नादात स्त्रिया त्यांच्या क्वालिटीकडे लक्ष देत नाहीत.
Makeup Tips : सुंदर दिसण्यासाठी अनेक स्त्रिया मेकअप (Makeup) करतात. यासाठी स्त्रिया (Women) अनेक प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स वापरतात. पण, बाजारात अनेक प्रकारचे स्वस्त मेकअप प्रोडक्ट्स विकत घेण्याच्या नादात स्त्रिया त्यांच्या क्वालिटीकडे लक्ष देत नाहीत. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याबरोबरच त्यांना त्वचेशी (Skin Care Tips) संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्वचेच्या नुकसानीमुळे, अनेक वेळा मेकअप केल्यानंतर त्यांना अचानक खाज सुटू लागते. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर ती त्वचेची समस्या असू शकते.
मेकअप प्रोडक्ट्स योग्य नाहीत
अनेक वेळा घाईघाईत महिलांना आपल्या त्वचेच्या स्किन टोननुसार मेकअप निवडता येत नाही. काही महिला डिस्काऊंटच्या शोधात ऑनलाईन साईटवरून मेकअप खरेदी करतात. बऱ्याच वेळा हे प्रोडक्ट एक्सपायर होतात ज्यामुळे त्वचेची ऍलर्जी होते. या उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे कोणतेही मेकअप प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी लक्षात ठेवा.
त्वचेची काळजी न घेणे
मेकअप करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या त्वचेनुसार त्वचेची काळजी घ्या. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नक्की स्वच्छ करा.
जास्त मेकअप वापरू नका
जास्त मेकअप केल्याने तुम्ही जास्त सुंदर दिसणार नाही पण तुमचा चेहरा खराब होईल. रोज मेकअप केल्याने त्वचेची छिद्रे अडकतात ज्यामुळे आपली त्वचा श्वास घेऊ शकत नाही. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात.
चांगला ब्रश न वापरणे
मेकअप करताना आपण आपला मेकअप लावण्यासाठी वापरलेला ब्रश आणि स्पंज स्वच्छ आहेत की नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे. यातील धुळीमुळे तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. वाईट मेकअप ब्रशेसमुळेही तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. अशा वेळी, आपण त्वरित त्वचेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाणेरडे मेकअप ब्रशमुळे त्वचेवर पुरळ उठू शकतात.
महिलांनी जर मेकअप करताना या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हाला कधीही त्वचेशी संबंधित कोणताही त्रास होणार नाही. तसेच, तुमचा चेहराही नेहमी फ्रेश आणि ग्लोईंग राहील यासाठी वरील पर्याय निवडा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :