(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Trending : बांधकाम सुरु असलेली इमारत का झाकली जाते हिरव्या कपड्यात? जाणून घ्या कारण
बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकण्यासाठी हिरव्या रंगाच्या कापडाचा वापर का केला जातो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Trending : अनेक वेळा प्रवास करताना तुम्ही खिडकीमधून बाहेर पाहिल तर तुम्हाला उंच इमारती दिसतील. त्या इमारती या हिरव्या रंगाच्या कापडानं झाकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. अनेकवेळा बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर हे हिरवं कापड तुम्ही पाहिलं असेल. अनेकांना हा प्रश्न पडला असे की बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकण्यासाठी हिरव्या रंगाच्या कापडाचा वापर का केला जातो? जाणून घेऊयात बिल्डींग झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापडाबाबत...
जिथे इमारतीचं बांधकाम सुरू असतं त्या इमारतीच्या परिसरात सतत धुळ आणि सिमेंट उडत असते. या सिमेंट आणि धुळीचा त्रास आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना होऊ शकतो.उडणाऱ्या धुळीचा त्रास लोकांना होऊ नये म्हणून बिल्डींग ही हिरव्या रंगाच्या कापडानं झाकली जाते. इमारत कापडानं झाकल्यानं धुळ, माती ही हवेत उडत नाही.
हिरव्या रंगाचेच कापड का वापरतात
काळ्या, पांढऱ्या किंवा इतर वेगळ्या रंगाच्या कापडाचा वापर बिल्डींग झाकण्यासाठी का केला जात नाही? असेल प्रश्न अनेकांना पडला आसेल. त्यामागे एक खास कारण आहे. हिरवा रंगा हा जास्त अंतरावरून पाहिला तरी ठळक आणि स्पष्ट दिसतो. तसेच रात्री थोडा प्रकाश असताना देखील हा रंग ठळकपणे दिसतो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या करपड्यानं इमारत झाकली जाते.
बांधकाम सुरू असलेली इमारत हिरव्या कापडाने का झाकली जाते ?
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये अनेक कर्मचारी काम करत असतात. या कर्मचाऱ्यांचे लक्ष उंचीवर असताना विचलित होऊ नये यासाठी हिरव्या रंगाच्या कापडानं इमारत झाकली जाते. असं ही म्हटलं जातं की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीकडे अनेक लोक पाहतात त्यामुळे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : मोराच्या अंड्याची चोरी करणं पडलं महाग, पुढे असं काही घडलं की...
- Viral Video : जिराफला खायला घालणं पडलं महागात, आईवडीलांनी वाचवला मुलाचा जीव
- Why We Use K Instead Of Thousand : एक हजारला का म्हटलं जातं 1K? काय आहे 'K'चा अर्थ,जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha