Viral Video : जिराफला खायला घालणं पडलं महागात, आईवडीलांनी वाचवला मुलाचा जीव
Viral Video : प्रत्येकाला वन्य प्राणी बघायचे असतात आणि त्यांना खायला घालायचे असते. अशा स्थितीत त्यांच्या जवळ जाणे काही वेळा धोकादायक ठरू शकते.
Viral Video : सध्या लोकांमध्ये वन्यजीवांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वन्यजीवांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. प्रत्येकाला वन्य प्राणी बघायचे असतात आणि त्यांना खायला घालायचे असते. अशा स्थितीत त्यांच्या जवळ जाणे काही वेळा धोकादायक ठरू शकते. साधे दिसणारे तृणभक्षी वन्यजीवही सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त करू शकतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
एका व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा त्याच्या पालकांसमोर कुंपणात उभ्या असलेल्या जिराफला खायला घालतो. त्यानंतर जिराफ मुलाच्या हातातील अन्न खाण्यासाठी आपली मान वाकवतो आणि ते तोंडात धरून वेगाने खेचू लागतो. यामुळे हातातील अन्नासह मूल हवेत वर जाऊ लागते.
Let go! 😂😳🥬🦒 pic.twitter.com/XaHr6lnf4U
— Laughs 4 All 🤟 (@Laughs_4_All) March 4, 2022
मुलाला हवेत पाहून मुलाचे पालक चांगलेच घाबरले आणि त्यांनी मुलाला घट्ट धरून ठेवले. दरम्यान, जिराफाची पकड सैल झाली आणि बालक सुखरूप बचावला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो यूजर्स त्याला लाइक आणि शेअर करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral : डायनासोरपेक्षा जुना आहे 'हा' प्राणी, इतका धोकादायक आहे की काही मिनिटांत मरतो माणूस
- Viral News : साप आणि विंचूचं डिटॉक्स सूप, प्यायला लोक उत्सुक, तुम्ही पाहिलं का?
- Russia Ukraine War : दोन अमेरिकन शास्त्रज्ञ अनेक महिन्यांपासून रशियन कॅप्सूलमध्ये बंद, बाहेर सुरु असलेल्या युद्धाची कल्पनाच नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)