Skin Care : टोमॅटोचा वापर करुन वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा फेसपॅक
Tomato facepack : टोमॅटो त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून तुम्ही त्वचेचं सौंदर्य वाढवू शकता.
Skin Care Tips : धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा (Skin) खराब होते. त्याशिवाय व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आपल्या त्वचेची हानी होते. पिंपल्स येऊन त्वचेवरील चमकदारपणा कमी होतो. तसेच त्वचेवरील पिंपल्स गेल्यावर त्याचे डाग राहतात. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेण्याची गरज असते. त्वचेवरील डाग दूर करून त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी वेळीच योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी अनेक लोक केमिकल्सयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण केमिकल्स असणारे ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यानं नुकसान होऊ शकतं. त्याऐवजी तुम्ही घरात तुमच्या स्वयंपाक घरात उपलब्ध असणारा टोमॅटो वापरूनही सुंदर आणि नितळ त्वचा मिळवू शकता.
टोमॅटो फेसपॅक तयार करा.
टोमॅटो फेसपॅक कसा बनवायचा (How to Make Tomato Facepack)
आवश्यक साहित्य
- टोमॅटो - अर्धा टोमॅटो
- बेसन - एक टीस्पून
- मध - दोन ते तीन थेंब
टोमॅटो फेसपॅक बनवायची पद्धत
- टोमॅटोपासून फेसपॅक तयार करण्यासाठी आधी टोमॅटो मध्यभागी कापून घ्या.
- यानंतर टोमॅटो बेसनच्या पिठात बुडवून त्यामध्ये दोन ते तीन थेंब मध मिसळा.
- आता हा टोमॅटो स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर चोळा.
- आता साधारण 10 मिनिटे तसेच राहू द्या.
- 10 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने पूर्णपणे धुवा.
- हा टोमॅटो फेसपॅक आठवड्यातून तीन वेळा वापरा.
टोमॅटो फेसपॅकचे फायदे (Tomato Facepack Benefits)
- टोमॅटो फेसपॅक त्वचेला एक्सफोलिएट करतो, त्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते.
- तसेच हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते.
- चेहऱ्यावर नियमित टोमॅटो फेसपॅक लावल्याने उन्हामुळे होणारं नुकसान भरून काढता येते. हा फेसपॅक टॅनिंग काढण्यास मदत करतो.
- टोमॅटोच्या फेसपॅकमुळे त्वचेवरील मुरुमांची समस्या कमी होते.
- टोमॅटो फेसपॅक त्वचेसाठी उत्तम नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या