Health Tips : हृदय आणि यकृतासाठी फायदेशीर मनुक्याचं पाणी, कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, वाचा फायदे
Raisin Water Benefits : सकाळी अनोशेपोटी मनुक्याचं पाणी पिणं हृदय आणि यकृतासाठी फायदेशीर आहे. याबद्दल सविस्तर वाचा.
How To Make Raisin Water : अनेकांना आरोग्यासंबंधित (Health) वेगवेगळ्या समस्या जाणवतात. याला आपली जीवनशैली (Lifestyle) कारणीभूत आहे. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. वजन वाढण्यासोबतच इतरही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याचा थेट परिणाम तुमच्या ह्रदयावर (Heart) आणि यकृतावर (Liver) होताना पाहायला मिळतो. यासाठी तुम्हाला पोषक आहाराची आवश्यकता असते. ह्रदय आणि यकृतासंबंधित आजारांपासून तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्हाला आहारावर नियंत्रण ठेवण्याशिवाय दुसरा कोणताही चांगला उपाय नाही. यासोबतच तुम्ही काही उपाय करु शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
मनुका आरोग्यासाठी किती गुणकारी आहे हे सर्वांनाचं माहित आहे. मनुक्याचं पाणी (Raisin Water) ह्रदय आणि यकृतासाठी अतिशय फायदेशीर असते. याचं सेवन केल्यानं तुमचं ह्रदय (Heart) आणि यकृत (Liver) निरोगी राहील शिवाय तुमचं कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील. मनुक्याच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर आणि लोह मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे याचं सेवन शरीरासाठी लाभदायक ठरते.
मनुक्याचं पाणी तयार करण्याची पद्धत
1- मनुक्याचं पाणी तयार करण्यासाठी दोन कप पाणी घ्या आणि सुमारे 150 ग्रॅम मनुका घ्या.
2. जास्त चमकदार मनुका वापरू नका, कारण या मनुका रसायनांनी चमकदार बनवल्या जातात. गडद रंगाचं आणि मऊ मनुके घ्या.
3. मनुका भिजवण्यापूर्वी धुवा आणि पॅनमध्ये पाणी उकळवा. आता त्यात धुतलेले मनुके टाका आणि रात्रभर ठेवा.
4. सकाळी हे मनुका असलेले पाणी गाळून हलके कोमट करून रिकाम्या पोटी सेवन करा. यानंतर सुमारे 30 ते 35 मिनिटं काहीही खाऊ नका.
5. हे मनुक्याचं पाणी चार दिवस रोज प्यायल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसून येतील.
मनुक्याचं पाणी पिण्याचे फायदे (Benefits of Raisin Water)
1. मनुक्याचे पाणी प्यायल्याने यकृतामध्ये बायोकेमिकल प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे रक्त जलद शुद्ध होते.
2. हे पाणी प्यायल्याने पचन सुरळीत राहते. गॅस आणि अपचनाची समस्या पूर्णपणे दूर होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
3. हे पाणी प्यायल्याने हृदय मजबूत राहते आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते.
4. मनुक्याचं पाणी तुमच्या यकृताच्या प्रक्रियेला गती देते, ज्यामुळे पचन सुधारते आणि पोटातील अॅसिड कमी होण्यास मदत होते.
5. मनुक्याचं पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यासही मदत होते. तुम्ही याचं सेवन नक्की करून पाहा. काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )