Weight Loss : व्यायाम न करता वजन कमी करायचंय? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
व्यायामाशिवाय वजन कमी करायचं असेल तर फॉलो करा या टिप्स
Weight Loss : काही लोकांना वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही काही टिप्स फॉलो करुन वजन कमी करु शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल करावे लागतील. तसेच काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवशक आहे. व्यायामाशिवाय वजन कमी करायचं असेल तर फॉलो करा या टिप्स...
सतत अॅक्टिव्ह रहा
वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला सतत अॅटिव्ह रहावं लागेल. बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे किंवा बेडवर झोपून राहणे या सवयींमुळे वजन वाढते. त्यामुळे जर तुम्ही या सवयी सोडल्या तर तुमचे वजन कमी होईल.
भरपूर पाणी प्या
कमी पाणी प्यायल्यानं शरीराचे वजन वाढू शकते. त्यामुळे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर किमान पाणी पिण्यासाठी वेळ काढा. दर तासाला एक ग्लास पाणी प्यायचा प्रयत्न करा. यामुळे शरीर उत्साही राहते. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल. गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. आयुर्वेदात असेही म्हटले आहे की सकाळी 2 कप कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उर्जा निर्माण होते. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने बेली फॅट्स कमी होतात.
फॅट्सचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाऊ नका
फॅट्सचे प्रमाण जास्त असेलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं वजन वाढते. त्यामुळे हल्दी पदार्थांचा किंवा फळांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे वजन वाढत नाही. तसेच नारळ पाणी किंवा मोड आलेली कडधान्यांचा आहारात समावेश तुम्ही करु शकता. मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश जेवणात करु नका. जेवण तयार करताना मोहरीच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचा वापर करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हेही वाचा:
- Weight Loss : जेवण करताना या चुका टाळा; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
- Milk for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे दुधाचे सेवन करा