एक्स्प्लोर
Advertisement
हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स; होतील भरपूर फायदे
हिवाळ्यात वजन कमी करणं अत्यंत अवघड असतं, कारण हिवाळ्यातील थंड आणि अल्हाददायी वातावरणामुळे सतत सुस्ती येत असते.
मुंबई : उन्हाळ्यात वजन कमी करणं अगदी सोपं असतं, याबाबत आपण अनेकदा ऐकत असतोच. कारण उन्हाळ्यात आपल्याला आळस किंवा सुस्ती फार कमी जाणवते. पण अगदी याउलट हिवाळ्यात जास्त आळस जाणवतो. त्याचसोबत भूकही फार लागते. ज्यामुळे हिवाळ्यात वजन कमी करणं फार कठीण होतं. जर तुम्हीही हिवाळ्यात वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने हिवाळ्यात वजन कमी करणं सहज शक्य होईल.
फक्त ताजे आणि आरोग्यदायी पदार्थांचं सेवन करा
हिवाळ्यात बाजारात ताज्या आणि सीझनल फळांची बाजारात आवाक वाढते. त्यामुळे बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात. आहारात फायबरचं प्रमाण अधिक ठेवा. त्याचबरोबर या दिवसात स्ट्रीट फूड किंवा जंक फूड खाणं टाळा.
हर्बल टी ठरेल फायदेशीर
हिवाळ्यात डिहाइड्रेशनची समस्या होणं फार सामान्य आहे आणि कधी-कधी आपल्याला वाटतं की, आपल्याला भूक लागली आहे. पण ती भूक नसून तहान लागल्याचे संकेत असतात. त्यामुळे यादरम्यान, हाय-कॅलरी ड्रिंक्स घेण्याऐवजी, हर्बल-टी सारखे म्हणजेच, ग्रीन टी, ब्लॅक टी आणि कॅमोमाइल टी यांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करा
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आहारात प्रोटीनचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. कारण यामुळे मेटाबॉलिज्म लेव्हल मेन्टेन राहण्यासाठी मदत होते. एवढंच नाहीतर रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरासाठी गुड फॅट्सही अत्यंत आवश्यक असतात.
व्यायाम करा
हिवाळ्यात आपल्याला फार सुस्ती येते, आराम करण्याचीही इच्छा होते. त्यामुळे या दिवसांत एक्सरसाइज करणं अनेकांना आवडत नाही. परंतु, हिवाळ्यात दररोज व्यायाम करणं गरजेचं असतं. यामुळे वजन नियंत्रणात राहतं. याचबरोबर हिवाळ्यात भरपूर पाणी पिणंही गरजेचं असतं.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
खोबऱ्याचे तेल फक्त केस आणि त्वचेसाठी नाहीतर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर; जाणून घ्या कसं?
हिवाळ्यात बदामाचं सेवन करणं ठरत फायदेशीर; जाणून घ्या फायदे
हिवाळ्यात फेशिअल करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
नाश्त्यासाठी पोहे खाल्याने होऊ शकतं वजन कमी; पण कसं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement