एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिवाळ्यात फेशिअल करण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
त्वचा उजळवण्यासोबतच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही फेशिअल अत्यंत फायदेशीर ठरतं.
मुंबई : फेशिअल फक्त त्वचा उजळवण्यासाठीच नाहीतर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. वातावरणातील बदलांसोबत त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशातच त्वचेची काळजी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात फेशिअल करावं की नाही? यांसारखे अनेक प्रश्न निर्माण होतात. अशातच हिवाळ्यात फेशिअल करणं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया फेशिअल केल्यामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत...
हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो. तसेच हवा शुष्क असते. त्यामुळे त्वचाही कोरडी होते. ज्यामुळे त्वेचेच्या अनेक समस्या उद्भवतात. यूव्ही रेजमुळे त्वचा कोरडी होण्यासोबतच त्वचेला नुकसानही पोहोचतं. अशातच फेशिअलमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
सावधान! त्वचेसाठी 'या' उत्पादनांचा वापर करणं ठरू शकतं घातक
त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते. फेशिअलमुळे त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत मिळते आणि फेशिअलमुळे त्वचेला भासणारी पोषक तत्वांची कमतरता दूर होते. फेशिअल करण्यासाठी ज्या उत्पादनांचा वापर केला जातो. त्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. जे त्वचेचं आरोग्य राखण्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतात. यामुळे फक्त अॅन्टीएजिंग नाहीतर त्वचेची सूज आणि इतर समस्या दूर करण्यासाठी मदत होते.
फेशिअल त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करतात आणि त्वचेवरील मृत पेशी दूर करतात.
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!
चेहऱ्यावरील घाण, कोरडेपणा आणि मृत पेशी यांमुळे त्वचेची रोम छिद्र बंद करतात. ज्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. अशातच फेशिअलमुळे रोमछिद्र ओपन होण्यास मदत होते.
त्वचा कोरडी झाल्यानंतर जळजळ, खाज आणि त्वचा लाल होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. अशातच फेशिअल त्वचा हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. फेशिअल करताना त्वचेवर मॉयश्चरायझर, सीरम आणि फेस मास्क लावला जातो. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.
टिप : सदर उपायाचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करणे फायदेशीर ठरते, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement