एक्स्प्लोर

Jalgaon : इन्स्टाग्रामवरुन प्रेम जुळले, विवाहित प्रेयसीला गोळ्या घालून स्वतःही संपला; जळगावात धक्कादायक घटना

Jalgaon Murder : गेल्या काही दिवसांपासून अनिता देवानंदला टाळत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. या रागातूनच ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. 

जळगाव : चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावात प्रेमसंबंधातून दुहेरी मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीची बंदुकीने गोळ्या घालून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.

Jalgaon Crime News : रक्ताच्या थारोळ्यात दोघांचे मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील अकुलखेडा गावातील जगदीश पाटील हे आपली पत्नी अनिता हिच्यासह राहत होते. शनिवारी सकाळी सुमारे 11 वाजता त्यांची मुलगी शाळेतून घरी परतली असता घराचा दरवाजा बंद असल्याचे तिला दिसले. दरवाजा उघडून आत गेल्यावर आई अनिता आणि एक अन्य व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

मुलीने तात्काळ वडिलांना फोन करून घरी बोलावले. त्यांनी गंभीर प्रकार पाहताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

Jalgaon Instagram Love Affair : इंस्टाग्रामवरील ओळखीतून जुळले प्रेमसंबंध

प्राथमिक तपासानुसार, अनिता आणि शिरपूर येथील देवानंद धनगर या तरुणाची काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले होते. दोघांमध्ये भेटीगाठी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनिता देवानंदला टाळत असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. या रागातूनच देवानंद धनगर याने अनितावर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Jalgaon Murder Police Investigation : पोलिसांचा पुढील तपास सुरू

या घटनेमागील नेमके कारण, वापरण्यात आलेली बंदूक आणि ती कुठून आणली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ
कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात, जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Embed widget