MPOX : दीड वर्षात हजारांपेक्षा अधिक मृत्यू, मुलांवरही संकट, MPOX किती धोकादायक, जाणून घ्या लक्षणं
MPOX Health Emergency : जागतिक आरोग्य संघटनेनं एम पॉक्सला आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केलं आहे. यापूर्वी देखील एमपॉक्सला जागतिग आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर करण्यात आलं होतं.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेनं काल एमपॉक्सला जागतिक आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या दोन वर्षात दुसऱ्यांदा एमपॉक्समुळं आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली आहे. डेमोक्रॅटिक रिपलब्लिक ऑफ कांगोमध्ये संसर्ग वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एम पॉक्सचा प्रसार कांगोच्या शेजारच्या देशामध्ये देखील झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांपूर्वी देखील एमपॉक्सच्या वाढत्या संसर्गामुळं आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर केली होती. जे पुरुष दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतात त्यांना या आजारामुळं त्रास झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत लोकांना जागरुक देखील केलं होतं. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आलं होतं. आफ्रिकेतील देशांमध्ये एमपॉक्स संक्रमण सार्वजनिक आरोग्य विषयक समस्या राहिलेली आहे. एमपॉक्सचा पहिला रुग्ण 1970 मध्ये कांगोमध्ये आढळून आला होता.
एमपॉक्सचा सध्याचा वाढलेला संसर्ग देखील कांगोत पाहायला मिळतो. या आजारामुळं लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून संसर्गापासून वाचण्यासाठी जनजागृती अभियान राबवलं जात आहे. कांगोत जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 27 हजार रुग्ण आढळले असून 1100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एमपॉक्स आजाराचा फटका मोठ्या प्रमाणावर मुलांना बसला आहे.
एमपॉक्समुळं कुणाला धोका?
एमपॉक्सचा सर्वाधिक धोका लहान मुलं, महिला आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना असतो. यामध्ये एचआयवीग्रस्त लोकांचा समावेश देखील असतो. कांगोमध्ये एमपॉक्सचे दोन स्ट्रेनचा प्रसार वेगानं होतं आहे. एनडेमिक फार्म आणि त्याचं नवं रुप या दोन्हीचा प्रसार होत आहे. एमपॉक्सच्या लक्षणांमध्ये प्रामुख्यानं ताप, सर्दी, थकवा जाणवणे अशी त्याची लक्षणं असून या आजारामुळं जीव देखील जाऊ शकतो.
एमपॉक्सच्या विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा वेगानं प्रसार होत असल्यानं वैद्यकीय क्षेत्रात चिंता आहे. कांगोमध्ये काही शिबिरांमध्ये मुलांमध्ये या विषाणूचा प्रसार होत आहे. एमपॉक्स पूर्व कांगो तून युगांडा, रवांडा, बुरुंडी आणि केनियात पसरलेला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्सला जागतिक आरोग्य विषयक आणीबाणी जाहीर केल्यानं कांगोला आता अधिक वैद्यकीय उपकरणं मिळतील, निधी जमवण्यात मदत होईल. कांगोमधील अधिकाऱ्यांना या आजाराचा सामना करता मदत होऊ शकते. विषाणूचा अभ्यास करण्यासाठी आणि प्रसार रोखण्यासाठी चांगल्या नियंत्रणाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं एमपॉक्सला रोखण्यासाठी 34 दशलक्ष डॉलर्सच्या मदतीचं आवाहन केलं होतं. मात्र, यावेळी त्याचा फायदा झाला नव्हता. एमपॉक्स प्रभावित भागात लसीदेखील पोहोचल्या नव्हत्या. लसीकरण प्रक्रिया राबवण्यात अडचणी आल्या होत्या. दोन वर्षानंतर देखील तशीच स्थिती आहे.
जगातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागात एमपॉक्स ही गंभीर समस्या आहे. या आजाराचा परिणाम लहान मुलांवर देखील होतो. मात्र, हा आजार करोना सारखा नाही. करोनाचा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरतो.
इतर बातम्या :
health: थोड्याशा पायऱ्या चढल्या की धाप लागते का? या छोट्या उपायांनी करा समस्या दूर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )