एक्स्प्लोर

health: थोड्याशा पायऱ्या चढल्या की धाप लागते का? या छोट्या उपायांनी करा समस्या दूर

श्वसनास अडथळा निर्माण होऊन श्वास गुदमरल्याचेही वाटू शकतं. पण यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्यातली ऊर्जा चांगली राहून ही समस्या दूर होऊ शकते.

Health: थोड्याशा पायऱ्या चढल्या की तुम्हालाही धाप लागते का? दिवसभराचं काम आणि ऊर्जा याचा जवळचा संबंध आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आजकाल जरा धावलं किंवा चार पायऱ्या चढल्या की दम लागतो. थोडीशी शारीरिक हालचाल ही घामेघुम करून टाकते. यासाठी काय करायचं? 

दररोजच्या कामाच्या गडबडीत नकळतपणे आपल्या आरोग्यावर असंख्य परिणाम होत असतात. त्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. मोठ्या विकारांची मूळ यात दडलेली असू शकतात. थोडसं धावलं किंवा जिना चढल्यावर अनेकांना धाप लागते. श्वसनास अडथळा निर्माण होऊन श्वास गुदमरल्याचेही वाटू शकतं. पण यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्यातली ऊर्जा चांगली राहून ही समस्या दूर होऊ शकते.

पायऱ्या हळू चढाव्या 

कितीही घाई असली तरी पायऱ्या चढताना घाईघाई केल्याने श्वास लागतो. सुरुवातीला थोड्या संथ गतीने पायऱ्या चढत नंतर हळूहळू वेग वाढवला तर शरीरावर ताण येत नाही. मुळात शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने धाप लागत असल्याने यावर मुळापासून काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. 

पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम 

सध्या धकाधकीच्या आयुष्यात अपुरी झोप आणि व्यायामाच्या अभावाने आपण अनेक त्रास ओढवून घेत असतो. मग धाप लागणं श्वास गुदमरणं अशा छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराच्या कुरबुरी दिसू लागतात. यासाठी पुरेशी झोप घेणं आणि शरीराला व्यायामाची सवय लावणं अत्यंत आवश्यक आहे. 

श्वास घेण्याच्या पद्धतीनेही पडतो परिणाम 

पायऱ्या चढताना श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे ही परिणाम होतो. वरवर श्वास घेतल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. आणि थोडीशी शारीरिक खर्च झाली तरी सुद्धा दम लागतो. अशावेळी दीर्घ श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो. 

पुरेसे पाणी प्या 

शरीरात पाण्याची पातळी संतुलित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. धावायला जाण्याआधी किंवा पायऱ्या चढण्याआधी घोटभर पाणी पिल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. डिहायड्रेशन ची समस्या उद्भवत नाही. 

आहारात करा बदल 

संतुलित आहाराचा आणि शरीराचा जवळचा संबंध आहे. आहारात फळे पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीर सुदृढ राहते. दिवसभर ऊर्जा टिकून राहते. थोडसं चालल्यावर धाप लागत असेल तर आपल्यासोबत ड्राय फ्रुट्स किंवा एखादं चॉकलेट ठेवावे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Hip Replacement: वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
वयाच्या 38 व्या वर्षी हिप रिप्लेसमेंट? सांधा खराब होण्याची कारणे अन् आधुनिक इम्प्लांट्सचे फायदे
Health News: रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
रात्री उशिरा जेवताय? भूकेपेक्षा जास्त खाताय? हायटस हर्नियाचा धोका वाढतोय.. काय काळजी घ्याल? तज्ज्ञ सांगतात...
Health Tips : वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
वेगाने वाढणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं; वाचा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला
Health News: काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता..कर्करोग उपचारानंतरही पुन्हा का उद्भवतो? पुनरावृत्तीची कारणे जाणून घ्या, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget