Breast Cancer : भारतात दर 4 मिनिटांनी एका महिलेला होतो स्तनाचा कर्करोग, संशोधनातून आले समोर
Breast Cancer : हा कर्करोग विशेषतः महिलांच्या स्तनांमध्ये होतो. स्तनाचा कर्करोग होण्याची विविध कारणे अनेक संशोधनातून समोर आली आहेत.
Breast Cancer : देशभरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer)प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हा कर्करोग विशेषतः महिलांच्या स्तनांमध्ये होतो. स्तनाचा कर्करोग होण्याची विविध कारणे अनेक संशोधनातून समोर आली आहेत. चुकीची जीवनशैली, अनुवांशिकता, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी तसेच लक्षणांची माहिती नसणे यामुळे महिलांमध्ये या गंभीर आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर वाढते वय, लठ्ठपणा, धूम्रपान, जास्त दारू पिणे, गर्भधारणेस विलंब होणं ही देखील कारणे आहेत.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने स्तनांमध्ये गाठ येणे, स्तनांच्या आकारात बदल होणे, स्तनांमध्ये वेदना होणे, निपल्समधून पांढरा स्त्राव, त्वचेत बदल यांचा समावेश होतो. जर तुम्हाला हा आजार टाळायचा असेल, तर ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब उपचार सुरू केले पाहिजे. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांसाठी मॅमोग्रामची शिफारस केली जाते. स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये मुख्यत्त्वे शस्त्रक्रिया, केमोथेरपी, हार्मोन थेरपी यांचा समावेश होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते.
दर 4 मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. तर उपचार घेत असताना भारतीय महिलांचे सरासरी वय पाश्चात्य महिलांपेक्षा एक दशक कमी आहे. इंडिया टीव्ही या इंग्रजी पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या एंडोक्राइन सर्जरी विभागाचे एचओडी प्राध्यापक आनंद मिश्रा यांनी ग्लोबोकन 2020 अभ्यासाचा हवाला देत ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
कर्करोगावर निदान करण्याच्या पद्धतीत बदल
KGMU ब्रेस्ट अपडेट 2023, 'लेट्स डू ऑन्कोप्लास्टी' शुक्रवारपासून दोन दिवसीय परिषद सुरू होत आहे. या थीम अंतर्गत स्तनाच्या कर्करोगावर त्वरित निदान आणि ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रिया तंत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. परिषदेचे आयोजक सचिव डॉ. कुल रंजन सिंग म्हणतात, नवीन तंत्रज्ञानामुळे स्तनाच्या कर्करोगावर निदान करण्याची पद्धत बदलली आहे. स्तन-संरक्षण शस्त्रक्रिया बदलली आहे. ऑन्कोप्लास्टिक स्तन शस्त्रक्रियेमध्ये नवीन शस्त्रक्रिया तंत्रांचा समावेश आहे. ज्यात कर्करोगाच्या शस्त्रक्रियेची तत्त्वे ही प्लास्टिक सर्जरीसह एकत्रित केली जातात, ज्यामुळे स्तनाचा आकार आणि प्रमाणबद्धता राखून कर्करोगाच्या उपचारांना अनुकूल बनवले जाते. डॉ. अमिता शुक्ला म्हणतात, भारतातील स्त्रिया सामान्यतः रोगाशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. उशीरा निदान होण्याचे हे एक कारण आहे आणि दुसरे म्हणजे ते उपचार टाळतात जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही.”
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Health Tips : तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला अनेकदा वेदना होत आहेत का? तर 'हे' कारण असण्याची शक्यता
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )