Health News : पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, मग त्यांना निपल्स का असतात? वाचा यामागचं कारण
Why Do Men Have Nipples : पुरुष बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरीही त्यांना स्तनाग्र (Nipples) का असतात? यामागचं कारण माहितीय?
Why Do Men Have Nipples : महिलांप्रमाणे (Female) पुरुषांनाही स्तनाग्र (Nipples) असतात. पुरुष (Male) बाळांना स्तनपान करू शकत नाहीत, तरीही त्यांना स्तनाग्र (Nipples) का असतात? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? पुरुषांना (Men) स्तनाग्र म्हणजे निपल्स का असतात? त्याचा गर्भाशी संबंध आहे का? मग पुरुषांमध्ये या अवयवाचा उपयोग काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या.
पुरुषांच्या शरीरात स्तनाग्र असण्यात काही अर्थ आहे का? त्याचा शरीरात काय उपयोग होतो. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला येथे मिळेल.
स्तनाग्रांचा विकास मानवी भ्रूणांमध्येच सुरू होतो. नर आणि मादी भ्रूणाच्या जनुकांमध्ये फारसा फरक नसतो. न्यूयॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील पॅलेओएनथ्रोपोलॉजिस्ट इयान टॅटरसॉल यांनी सांगितले की, गर्भातील नर किंवा मादी भ्रूणामध्ये सुरुवातीला समान अनुवांशिक ब्लूप्रिंट असते. म्हणजे भ्रूणाच्या जनुकांमध्ये काही फरक नसतो.
पुरुषांमध्ये 'या' अवयवाचा उपयोग काय?
पुरुषांमध्ये स्तनाग्र हा एक वेस्टिजियल अवयव (Vestigial Organ) आहे. वेस्टिजियल अवयव म्हणजेच ज्याचा काहीही उपयोग नाही. गर्भधारणेच्या सहा ते सात आठवड्यांनंतर Y गुणसुत्रांमुळे (Y Chromosome) पुरुषाचे शरीर तयार होऊ लागते. सर्वात आधी, वृषणाचा (Testes) विकास होतो. हा अवयव शुक्राणू (Sperm) साठवण्याचे काम करतो.
तसेच, Y गुणसुत्रांमुळे टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोन देखील तयार करतो, हा हार्मोन पुरुष संप्रेरक असतो. हे हार्मोन गर्भाच्या विकासाच्या वेळी 9 आठवड्यांपासून बाहेर पडण्यास सुरुवात होते. या हार्मोनमुळे भ्रूणामध्ये जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक बदल होण्यास सुरुवात होते. मेंदूचाही अशाच प्रकारे विकास होऊ लागतो.
पुरुषांमध्ये स्तनाग्रांची गरज काय?
इयान टॅटरसॉल यांनी सांगितले की, पुरुषांमध्ये असणाऱ्या स्तनाग्रांचा शरीरातील कोणत्याही प्रकारच्या चयापचय क्रियेशी संबंधित नाही. पुरुषांमध्ये या अवयवाची गरज नसते. पुरुषांमध्ये हा अवयव नसेल तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
'हे' आहे यामागचं कारण
सुरुवातीला मादी आणि नर भ्रूणाचा विकास सारख्याच प्रकारे होतो. त्यामुळे भ्रूणामध्ये स्तनाग्र सुरुवातीपासूनच असतात. त्यानंतर गुणसुत्रांमुळे भ्रूणा जननेंद्रियांशी संबंधित अनुवांशिक बदल होण्यास सुरुवात होते. त्यानंतर त्याचे मादी आणि नर भ्रूणात रुपांतर होते. पुढे वयानुसार, पुरुष आणि महिलांमध्ये जननेंद्रियांसंबंधित बदल होतात. त्यामुळे पुरुषांच्या शरीराच आधीपासून उपस्थित असलेले स्तनाग्र कायम राहतात. त्यांचा पुरुषांना काहीही उपयोग होत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )