एक्स्प्लोर

Weight Loss : लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं?

Weight Loss Tips : लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं, असं बऱ्याचदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकतो. पण या गोष्टीत किती तथ्य आहे, हे जाणून घेऊयात...

Weight Loss Tips : लॅाकडाऊनच्या काळात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे. त्यातच सतत एका जागी तासन्तास बसून बहुतांश जण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. वाढणारं वजन ही तशी सर्वांसाठीच डोकेदुखी. वाढणारं वजन कमी करण्यासाठी अनेकजण अतोनात प्रयत्न करत असतात. बाजारात मिळणारी औषधं, जिममध्ये घाम गाळणं, घरगुती उपचार, डाएट प्लान यांसारखे अनेक उपाय केले जातात. 

बऱ्याचदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकलं आहे की, एक ग्लास लिंबू पाणी मधासोबत प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांकडूनही अनेकदा दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण खरंच सकाळी अनोशापोटी लिंबू पाणी प्यायल्यानं फायदा होतो? तसेच, अनेक तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला का देतात? जाणून घ्या... 

आपल्या सर्वांना माहीतच आहे की, लिंबू पाणी आपल्या शरीरातील पचनसंस्था सुधारण्याचे काम करते. त्याचबरोबर आपल्या शरीराला असणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरजही लिंबू पाणी पूर्ण करते. तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि त्यातल्या त्यात लिंबामधील गुणधर्म पोटावरील फॅट्स कमी करण्याचं काम करतं. लिंबामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, पेक्टिन आणि सायट्रिक अॅसिड असतं. फ्री रेडिकल्सविरोधात संरक्षण करण्यासोबतच अॅन्टीऑक्सिडंट्स हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर आपल्याला कॅन्सरसारख्या आजारापासून सुटका मिळू शकते. 

वजन कमी करण्यासाठी कसं फायदेशीर ठरतं लिंबू पाणी?

लिंबू पाण्यात शरीराला आवश्यक असणारी अनेक पौष्टीक तत्व असतात. तसेच यापैकी काही पौष्टीक तत्व वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये पेक्टिन असतं. ज्यामुळे सतत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. लिंबातील फ्लेवोनॉयड्स शरीरातील मेटाबोलिज्म वाढवतात. मेटाबोलिज्म वजन कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराची सूजही कमी होते. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं कामही लिंबू पाणी करतं. लिंबामध्ये पोटॅशियम असंत, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. 

घरीच तयार करा लिंबू पाणी 

दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. त्यासाठी पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. वजन कमी करण्यासाठी त्यात एक चमचा जिऱ्याची पूडही एकत्र करु शकता. त्यानंतर या मिश्रणाला एक उकळी घ्या. पाणी गाळून त्यात एक चमचा मध घाला. 

(टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
Health News: गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा
गॅस, पोटफुगीसाठी स्वतःहून औषधं घेता? थांबा! डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा इशारा

व्हिडीओ

India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Mumbai Accident: रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
रेल्वे, बेस्ट ते रस्त्यांपर्यंत, मुंबईत चिरडून मरणं अगदी स्वस्त झालंय; कांदिवलीत फक्त 30 मिनिटात रस्त्यावरील ऑईलमुळे 14 दुचाकी फरफटत गेल्या, अनेक जखमी
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, तुळशी गावात भेट; 50 लाखांची मदतही दिली, दुष्काळ परिस्थितीबाबत मोदींना सांगणार
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Embed widget