सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर
कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी आपण सर्वजण सर्रास सॅनिटायजरचा वापर करतो. मात्र, सॅनिटायजरचा वापर लहान मुलांसाठी घातक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
![सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर Can Sanitizer be misused by blind children, these facts came out from studies सॅनिटायजरच्या चुकीच्या वापराने मुलं होऊ शकतात अंध! अभ्यासातून माहिती समोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/23014849/Sanitizer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी हात स्वच्छ ठेवण्यासाठी हॅण्ड सॅनिटायजरचा वापर वाढला आहे. सॅनिटायझरमुळे विषाणूपासून बचाव होत असला तरी याचे लहान मुलांवर मोठे दुष्परिणाम होत आहेत. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार हॅण्ड सॅनिटायझरच्या वापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याच म्हटलं गेलंय.
कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढला तसा घरोघरी, कार्यालयात आता अगदी सार्वजनिक ठिकाणी सुद्धा सॅनिटायजरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. त्यामुळे फ्रेंच पॉइजन कंट्रोल सेंटरच्या (पीसीसी) च्या संशोधकांनी हॅण्ड सॅनिटायझरच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या समस्येत वाढ झाली असल्याचे संशोधनात म्हटले आहे. आता यातील अधिकाधिक समस्या या डोळ्यांशी संबंधित असून लहान मुलांच्या डोळ्यांना या सॅनिटायजरच्या वापरामुळे अपाय झाल्याच्या तक्रारी समोर आल्यात.
या संशोधनत सांगितल्याप्रमाणे हॅण्ड सॅनिटायझरमध्ये जवळपास 70 टक्के अल्कोहोल असते. शिवाय इतर केमिकल्समुळे योग्य पद्धतीने सॅनिटायजरचा वापर न केल्याने मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकाच काय तर मुलांना अंधत्व येण्याची भीती या संशोधनात व्यक्त करण्यात आली आहे.
हॅन्ड सॅनिटायजमुळे डोळे झळझळणे, डोळे लाल होणे, शिवाय डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याचं समोर येताय. शिवाय, हे प्रमाण शहरी भागातील नागरिकांमध्ये जास्त असून अगदी लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत लोकं याबाबत तपासणीसाठी येतात. त्यामुळे सॅनिटायजर ऐवजी लहान मुलांना साबणाने हात धुण्याचा सुद्धा पर्याय डॉक्टरांनी सांगितला आहे. त्यामुळे संशोधक, डॉक्टर्स यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मोठ्या व्यक्तींच्या देखरेखीत लहान मुलांना हॅण्ड सॅनिटायझर वापरण्यास द्या व सॅनिटायजर वापरताना योग्य ती खबरदारी घेऊनच आपल्या डोळ्यांचीसुद्धा तितकीच काळजी घ्या.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)