Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी रोज खा पिस्ता, रक्त वाढण्यासही होईल मदत
Health Benefits of Pistachio : पिस्ता खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा. पिस्ता लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
Health Benefits of Pistachio : निरोगी राहण्यासाठी आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश करणे आवश्यक आहे. काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता यांसारखे सर्व ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. तुम्ही त्यांचा आहारात नक्कीच समावेश करा, पण जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पिस्ता जरूर खा. पिस्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता पोषक आणि फायबर समृद्ध आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आढळतात. पिस्त्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
1. वजन कमी करण्यात मदत
दररोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. पिस्ता खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, त्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
2. मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.
3. अॅनिमियाची समस्या दूर करते
पिस्त्यामध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. यामुळे अॅनिमियासारखी समस्या दूर होते आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.
4. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
पिस्त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि झिंक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पिस्त्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि झिंक आढळतात, जे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे.
5. पचनासाठी फायदेशीर
पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. यामुळे पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करा.
6. त्वचा आणि केसांना मुलायम बनवते
पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. पिस्त्याचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पिस्त्यात तांबे आढळते जे केसांसाठी फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )