health: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियानंतर आता टायफॉईडची साथ, या लक्षणांकडे दुर्लक्ष नको
दरवर्षी पावसाळ्यात टायफॉईडचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात हवेतील ओलावा शिजलेल्या अन्नाला लवकर नासवतो.
Typhoid symptoms: पावसाळा आला की डेंग्यू, मलेरियासह सर्दी पडसं डोकं वर काढतंच. लहान मुलांना तर या संसर्गजन्य आजारांची अधिकच भीती असते. आता डेंग्यू, मलेरियासह टायफॉईडचाही धोका वाढला असून दुषित पाण्यानं होणारा या आजारात रुग्ण गळून जातो. तापानं फणफणून अतिसार, जुलाब उलट्यांसारखी लक्षणं दिसू लागली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस केली जाते.
दरवर्षी पावसाळ्यात टायफॉईडचे रुग्ण आढळतात. पावसाळ्यात हवेतील ओलावा शिजलेल्या अन्नाला लवकर नासवतो. यामुळे अन्न आणि पाण्यात साल्मोनेला टायफी नावाची बुरशी तयार होते. हे अन्न आणि पाणी शरिरात गेलं की ही बुरशी आतड्यांवर हल्ला चढवते आणि टायफॉईडचा संसर्ग त्या व्यक्तीस होतो.
काय आहेत टायफॉईडची लक्षणं?
खूप ताप येणे. सुरुवातीला कणकण, मग हलका ताप येऊन तो वाढत जातो. ही अतिशय चिंतेची बाब असून तापाबरोबर अतिसार, उलट्या, जुलाब, अशक्तपणा अशी लक्षणं दिसून येतात. टायफॉईड झाल्यानंतर भूक कमी होऊन प्रचंड थकवा आणि गळाठा येतो.
काय काळजी घ्यावी?
बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.
भरपूर पाणी प्या. शक्यतो पाणी उकळून घेणे चांगले.
ताजे अन्न खावे. शिळे, उरलेले अन्नपदार्थ खाणं टाळा.
वरील लक्षणे आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं रक्ताच्या तपासण्या करून घ्या.
टायफॉईड तापाचे निदान असे करतात
टायफॉईडचे निदान करण्यासाठी रुग्णाचे रक्त व मल परीक्षण करण्यात येते व त्यामध्ये टायफॉईड जिवाणू आहेत का ते पाहिले जाते. तसेच एंजाइम लिंक्ड इम्यूनोसोर्बेंट टेस्ट, फ्लुरोसेंट एंटीबाडी टेस्ट, विडाल टेस्ट सुध्दा केली जाऊ शकतात.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )