Coffee Benefits: कॉफीप्रेमींनो ऐकलंत का! कॉफी पिल्याने खरंच व्यक्तीचं आयुष्य वाढते? अनेकांना माहीत नाही कारण, संशोधनात म्हटलंय..
Coffee Benefits: एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, जर आपण सकाळी कॉफी प्यायलो तर त्यामुळे तुमचे आयुष्य वाढू शकते. सर्व काही जाणून घेऊया.
Coffee Benefits: आपल्यापैकी अनेकजण हे असे आहेत, ज्यांना चहा-कॉफीचं सेवन केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. सकाळी उठल्यानंतर त्यांना चहा किंवा कॉफी लागतेच. त्यापैकी कॉफी हे एक असे पेय आहे ,जे जगभरातील बहुतेक लोक पितात. लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कॉफी पितात, कारण ते एनर्जी बूस्टर ड्रिंक आहे. एका नवीन अभ्यासातून असे समोर आले आहे की, जर आपण एका अशा वेळी कॉफी प्यायलो, तर आपले आयुष्य अधिक वाढू शकते. याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पेय
कॉफी आणि चहा हे दोन्ही जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पेय आहेत. बहुतेक लोक ही पेये पिऊन सकाळची सुरुवात करतात. बऱ्याच वेळेस, आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, कॉफी किंवा चहा रिकाम्या पोटी पिऊ नये, कारण त्याचे काही दुष्परिणाम आहेत. मात्र, माफक प्रमाणात सेवन केल्यास, आपल्याला दोन्ही पेयांचे आरोग्यदायी फायदे मिळतील. एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, जर आपण सकाळी कॉफी प्यायलो तर ते तुमचे आयुष्य वाढवू शकते. संशोधनाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
अभ्यास काय सांगतो?
हे संशोधन 1999 ते 2018 दरम्यान 40,725 लोकांवर पोषण परीक्षा सर्वेक्षणाद्वारे करण्यात आले आहे. खरं तर, या संपूर्ण कालावधीत, संशोधन पथकाने सर्व लोकांचा दैनंदिन आहार आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवनाचे मूल्यमापन केले आहे. त्यांची दर आठवड्याला तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांना आढळले की सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी सकाळी कॉफी प्यायल्यास त्यांचे आयुष्य 16% पर्यंत वाढते. त्याचबरोबर दिवसभरात इतर वेळी कॉफी प्यायल्यास काही तोटेही दिसून आले आहेत.
सकाळी कॉफीचे सेवन केल्यास...
विओनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जे लोक सकाळी कॉफी पितात, त्यांना कार्डिओ समस्यांचा धोका कमी असतो. त्याच वेळी, दिवसाच्या कोणत्याही वेळी कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये असे कोणतेही आरोग्यदायी बदल दिसून आले नाहीत. या संशोधनात असा कोणताही दावा नाही की, जर तुम्ही सकाळी कॉफी प्यायलात तर तुम्हाला हृदय किंवा कार्डिओचा त्रास होणार नाही किंवा त्यामुळे मृत्यू होणार नाही. याची पुष्टी करण्यासाठी अजून संशोधनाची गरज आहे.
रोज सकाळी कॉफी पिण्याचे फायदे
- दररोज 1 कप कॉफी प्यायल्याने ऊर्जा वाढते.
- कॉफी प्यायल्याने तुमचा फोकस वाढतो आणि तुमचा मेंदू रिलॅक्स होतो.
- कॉफी प्यायल्याने शरीराला अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
- कॉफी वजन कमी करण्यासही मदत करते.
- कॉफीचे सेवन केल्याने बीपी आणि मधुमेह नियंत्रित राहतो.
हेही वाचा>>>
काय सांगता! HMPV व्हायरसचा किडनीवरही होतो परिणाम? काय काळजी घ्याल? आरोग्य तज्ज्ञ काय सांगतात..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )