Breast Cancer : महिमा चौधरीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं आणि प्रकार
Breast Cancer : वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. काही गोष्टींची काळजी घेतल्यास ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.
Breast Cancer Symptoms : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोरग्याकडेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. यामध्येच स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा (Breast Cancer) धोका सर्वाधिक असतो. दरवर्षी जगभरातील सुमारे 2.1 दशलक्ष महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त होतात. जीन्समधील बदलांमुळे स्तनाच्या पेशींचे विभाजन आणि वाढ होते तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. त्यामुळे स्तनामध्ये गाठ निर्माण होते. ही गाठ तुम्हाला स्पर्श करूनही जाणवू शकते. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरमुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात, याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध महिमा चौधरीलासुद्धा (Mahima Chaudhry) ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे कोणती आणि ब्रेस्ट कॅन्सर कसा टाळावा हे जाणून घ्या.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं :
सुरुवातीला ब्रेस्ट कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तथापि, सर्वात सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये गाठ. याशिवाय या लक्षणांकडेही लक्ष द्या.
1. स्तनात गाठ जाणवणे. परंतु, दाबल्यावर वेदना न होणे.
2. स्तनाच्या आकारात बदल होणे.
3. स्तनाग्रातून द्रव स्त्राव बाहेर येणे.
4. काखेच्या भागात सूज किंवा गाठ येणे.
5. स्तनाग्राला (ब्रेस्ट निपल्स) लाल किंवा काळसर रंग येणे.
स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार (Types of Breast Cancer) :
1. आक्रमक (इन्वेसिव्ह) : हा वेगाने पसरणारा कर्करोग आहे.
2. नॉन-इन्वेसिव्ह : हा कर्करोग स्तनाच्या कर्करोगाच्या 80 टक्के प्रकरणांमध्ये आढळतो आणि तो खूप हळूहळू पसरतो.
3. दाहक स्तनाचा कर्करोग : हा कर्करोग फार दुर्मिळ आहे. यामध्ये कॅन्सरच्या फक्त 1 टक्के केस आढळते. मात्र, हा आजार वेगाने शरीरात पसरतो.
4. पेजेट्स डिसीज : या कॅन्सरमध्ये निप्पलचा भाग पूर्णपणे काळा होतो. यामध्ये 5 टक्क्यांहूनही कमी प्रकरणे नोंदवली जातात.
स्तनाच्या कर्करोगास प्रतिबंध कसे कराल?
- वाढत्या वयात महिलांनी आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे.
- जास्त मद्यपान किंवा धूम्रपान टाळावे.
- दररोज व्यायाम किंवा काही शारीरिक हालचाली करा.
- काही वेळ योग आणि ध्यान करा.
- संतुलित आहार घ्या. भरपूर फळे आणि भाज्या खा आणि शरीराला हायड्रेट ठेवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Hypertension in Adults : तरूणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण का वाढते? जाणून घ्या उपाय
- Hip Bone Symptoms : राज ठाकरेंवर हिप बोनची शस्त्रक्रिया; हा आजार नेमका काय? वाचा संपूर्ण माहिती
- Health Tips : भेगा पडलेल्या टाचांसाठी 'हे' करा सोपे घरगुती उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )