Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घेत धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा नेता असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.
जालना : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याही अडचणीत आणखी भर पडली आहे. बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. परिणामी मराठवाड्यातील बीड परळीसह इतर गावात हे प्रकरण अधिकच तापले आहे. दुडारीकडे याप्रकरणी विरोधी पक्ष आणि भाजपचे नेतेही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव घेत धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा नेता असून त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री साहेब याला थांबवा, अशा टोळीमुळे त्रास झाला तर...
या प्रकरणी न्याय देवता न्याय करणार आहे. आरोपीला तळतळाट लागला आहे. मात्र आरोपी वाचवा म्हणून काही नेत्यांनी फोन केला असणार. परंतु हे सर्व आरोपी आणि यात पाठबळ पुरवणारे सर्व चार्जसीटमध्ये आले पाहिजे. धनंजय मुंडेची टोळी संपली पाहिजे. अंडर ट्रायल केस झाली पाहिजे. जातिवाद आणि दंगली घडवून आणणारी प्रचंड मोठी टोळी धनंजय मुंडे यांची आहे. माननीय न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर एसआयटी आणि सीआयडी कसून तपास करणार आहे. यांनी एकमेकांना व्हिडिओ दाखवले,आनंद व्यक्त केले आहे.
किंबहुना धनंजय मुंडे यांना आजवर देशमुख कुटुंबाला भेटायला यावं असं वाटलं नाही. जेव्हा की हा माणूस सरकार मधला व्यक्ती आहे. कारण बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली नाही पाहिजे, धनंजय मुंडेला राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुख्यमंत्री साहेब याला थांबवा. अशा टोळीमुळे त्रास झाला तर आम्ही देखील सहन करणार नाहीत. असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी बोलताना दिला आहे.
खंडणीतलील आरोपीला शोधून सगळ्यांची नार्को टेस्ट करा- मनोज जरांगे
पडद्याच्या पाठीमागे राहून धनंजय मुंडे साठीच वाल्मिक कराडने (Walmik Karad) माया जमवली. ही जातीयवादी पसरवणारी टोळी असून
ही टोळी माजलेली आहे. मात्र यांचा माज उतरवायला टाईम लागणार नाही. न्यायालय पुढे आज आंदोलन सुरू आहे. कुठे गेली तुमची लावलेली संचारबंदी? ते जवळ करायच्या लायकीचे आहेत का? त्यांना सामाजिक सलोखा ठेवायचा नाही? आरोपींना हे साथ कसे देऊ शकतात? अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा असला आणि टोळीच्या जीवावर जात बदनाम करत असला तर आम्ही सहन करणार नाही. यांना सगळ्यांना मोक्का आणि 302 लावून यांचे अंडरट्रायल चालवा.
खंडणी मागायला लावली जे गेले ते त्यांना खून पूर्ववैमनस्यातून करायला लावले. खून करणाऱ्या पेक्षा घरी बसणारा आरोपी आणि त्यांना साथ देणारा मंत्री हे खरे गुन्हेगार आहेत. खंडणीतलील आरोपीला सुद्धा शोधा. यांच्या सगळ्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी बोलतांना केली आहे.
हे ही वाचा