एक्स्प्लोर

Fraud Medicine : 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल, तुम्ही घेत असलेली औषधं यापैकीच तर नाही ना? तपासून पहा

Medicines : कॅल्शियम, मल्टिव्हिटामिन, अँटिबायोटिक्ससहित 48 अशी औषधं जी आपल्या गुणवत्ता चाचणीत नापास झालीत, तुम्ही घेत असलेली औषधं यापैकी तर नाही ना?

Medicine :  कॅल्शियम, मल्टिव्हिटामिन, अँटिबायोटिक्ससह अशी 48 औषधं आहेत जी गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरली आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपल्या तपासणी अहवालात असं उघड केलंय की अशी 48 औषधे आहेत जी त्यांच्या गुणवत्ता तपासणीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात एकूण 1497 औषधांची गुणवत्ता तपासण्यात आली होती. त्यापैकी 48 औषधे बिनकामी असल्याचं सिद्ध झालं. या तपासणीत असे दिसून आलंय की यापैकी तीन टक्के औषधे मानवी वापरासाठी योग्य नाहीत.

या औषध कंपन्यांचा समावेश आहे

औषधी आणि वैद्यकीय उपकरणं, सौंदर्यप्रसाधने उत्तम दर्जाची नसल्याचे आढळून आलंय. या गोष्टी मानवी वापरासाठी योग्य नाहीत. ही औषधे बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँड्सची आहेत. CDSCO च्या चाचणी अहवालात उत्तराखंडमध्ये 14, हिमाचल प्रदेशात 13, कर्नाटकातील 4, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 2-2 आणि गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि पुद्दुचेरीमधील प्रत्येकी एक औषधांचा समावेश आहे. PSU कर्नाटक अँटिबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स, उत्तराखंड-आधारित सिनोकेम फार्मास्युटिकल्स, हरियाणा-आधारित नेस्टर फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेश-आधारित JBJM पॅरेंटरल, सोलन-आधारित रोनाम हेल्थकेअर आणि मुंबई-आधारित ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससह ही औषधं खाजगी आणि सरकारी औषध निर्मात्यांद्वारे उत्पादित केली जातात.

CDSCO च्या अहवालानुसार, या औषधांमध्ये Lycopene Mineral Syrup सारखी औषधं देखील समाविष्ट आहेत, ज्याचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात. याशिवाय व्हिटॅमिन सी इंजेक्शन, फॉलिक अॅसिड इंजेक्शन, अल्बेंडाझोल, कौशिक डॉक-500, निकोटीनामाइड इंजेक्शन, अमोक्सॅनॉल प्लस आणि अल्सिफ्लॉक्स सारखी औषधं आहेत. ही औषधं जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, अॅलर्जी टाळण्यासाठी,  अॅसिड नियंत्रित करण्यासाठी आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी वापरली जातात.

या औषधांमध्ये एका प्रसिद्ध कंपनीची टूथपेस्टही निकषात नापास झाल्याचं आढळून आले आहे, ज्याचा वापर लोक खूप करतात.  या तपासणीत नाकाम झालेल्या औषधांबाबत फार्मा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्याचं उत्तर मागविण्यात आले आहे. सर्व औषध निरीक्षकांना फार्मा कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्या औषधांच्या अहवालापैकीच एक माहिती अशी आहे की, सीडीएससीओचे काम औषधांच्या बाबतीत काय असायला हेव तर, CDSCO दर काही महिन्यांनी वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांच्या औषधांचे नमुने तपासत असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात जवळपास 50 औषधे निकामी झाली होती. त्यात प्रतिजैविकांचा समावेश होता. अखेर महत्वाचा मुद्दा हा आहे की ग्राहक अथवा रुग्ण जी काही औषधं घेतात आणि सेवन करतात ती योग्य ती खात्रीलायक बाबींनी घेणं गरजेचं आहे. सेवन करत असलेल्या औषधांची खात्री करुन घेणं अत्यंत आवश्यक हे. 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget