(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : चहाचा आस्वाद घ्या पण त्याबरोबर 'हे' पदार्थ कधीही खाऊ नका; नाहीतर नुकसान होईल
Health Tips : चहाचा आस्वाद घेताना अनेकदा आपण त्याच्याबरोबर काय खातोय याकडे लक्ष देत नाही.
Health Tips : चहाचे (Tea) शौकीन तर तसे अनेकजण असतातच पण चहाबरोबर काहीतरी खाणं किंवा पिणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण चहाबरोबर काही गोष्टी खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान पोहोचते हे अनेकांना माहीत नसते. चहाचा आस्वाद घेताना अनेकदा आपण त्याच्याबरोबर काय खातोय याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी थोडी सावधगिरी बाळगली तर आपण चहाचा आस्वाद घेऊ शकतो आणि आपल्या आरोग्याचीही चांगली काळजी घेऊ शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या चहाबरोबर खाऊ नयेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
लिंबाचा रस :
चहा आणि लिंबू एकत्र घेणे टाळावे. लिंबूमधील व्हिटॅमिन सी आणि चहामध्ये असलेले कॅफीन एकमेकांचा प्रभाव कमी करतात. इतकंच नाही तर चहामध्ये असलेले ट्रेस एलिमेंट्स आणि लिंबाचे अॅसिड एकमेकांना नुकसान पोहोचवतात. लिंबूबरोबर चहा प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्याही होऊ शकतात. लिंबू आम्ल आणि चहाचे ट्रेस घटक एकत्र पोटात जळजळ निर्माण करू शकतात. त्यामुळे चहाबरोबर लिंबाचे कधीही सेवन करू नये.
हळदीचे पदार्थ खाऊ नका
चहामध्ये कॅफिन असते ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते पण हळद गरम असते. चहामध्ये हळद घालून प्यायल्यास शरीर अधिक गरम होते. यामुळे आपल्याला घाम येणे, चक्कर येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय पोटात जळजळ होणे, गॅस बनणे यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे चहाबरोबर हळद असलेले अन्न कधीही खाऊ नका.
तळलेले पदार्थ
पावसाळ्यात लोकांना चहा आणि भजी खायला फार आवडतात. पण भजी, विशेषत: तळलेले भझी आरोग्यासाठी नुकसानकारक असू शकतात. भज्यांमध्ये असलेले बेसन शरीरातील पोषक तत्वांना शोषून घेण्यापासून रोखतात. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चहाबरोबर भजी खाऊ नका.
ड्रायफ्रूट्स खाऊ नका
अक्रोड, बदाम, काजू इत्यादी ड्रायफ्रूट्स खूप पौष्टिक असतात. पण, ते चहाबरोबर ड्रायफ्रूट्स खाणे चांगले नाही. ड्रायफ्रूट्समध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे चहामध्ये आढळणाऱ्या घटकांशी जुळत नाही. त्यामुळे दोन्हीचे फायदे कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :