एक नाही, दोन नाही तर गाजर खाण्याचे आहेत अनेक फायदे...
benefits of eating carrots बहुगुणी गाजर शरीरातील विविध अवयवांसाठी पोषक आहे. गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने आपल्याला त्याचा फार फायदा होतो.
Benefits of Eating Carrots : तसं तर अनेकजण आपल्या आहारात खासकरुन सलाडमध्ये गाजराच्या प्रामुख्यानं समावेश करतात. गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. पण गाजर कसंही खाल्लं तरी ते आपल्यासाठी फायदेशीरच आहे. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरुपात. बहुगुणी गाजर शरीरातील विविध अवयवांसाठी पोषक आहे. गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने आपल्याला त्याचा फार फायदा होतो.
गाजर खाण्याचे आपल्याला होणारे दहा फायदे जाणून घ्या...
1. गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.
2. रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.
3. गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.
4. दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. लहान मुलांना दात येताना गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही.
5. गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.
6. गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.
7. पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं.
8. पोटात जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जातील.
9. जुलाब होत असल्यास गाजर वाफवून त्याचा रस थोड्या थोड्या वेळाने प्यावा.
10. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























