Health Care Tips : फिट राण्यासाठी घरी करा हा व्यायाम; जिममध्ये जाण्याची गरज नाही
Indoor Workouts : झटपट वजन कमी करायचं असेल तर घरच्या घरी हा व्यायाम करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
Indoor Workouts : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काही लोक डाएटिंग करतात तर काही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. पण अनेकांना जिममध्ये जाऊन वर्कआऊट करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर घरच्या घरी हा व्यायाम करा. हा व्यायाम केल्याने तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
डान्स करा- रोज सकाळी अर्धा तास डान्स केल्याने शरीराचा चांगला व्यायाम होतो. झुंबा हा डान्सचा प्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता. सकाळी रोज डान्स केल्याने दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल, डान्समुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात. तसेच चरबी देखील कमी होते.
योगा आणि सूर्यनमस्कार-
योगाचे वेगवेगळे प्रकार घरच्या घरी केल्याने तुमचे वजन झटपट कमी होईल. तसेच सूर्यनमस्कार केल्याने देखील वजन कमी होते. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील मसल्स स्ट्रेच होतात. चेहऱ्यावर दिसणारी चरबी म्हणजेच फेस फॅटची समस्या असणाऱ्यांनी फेशियल योगा करावा. फेशियल योगा हा चेहऱ्याचा मसाज आणि व्यायमाचा प्राकार आहे. हा योगा केल्याने चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचा उत्तेजित होते. तसेच या योगाने तणाव आणि चिंता कमी होतात.
प्राणायम करा- प्राणायम केल्याने रेस्पिरेटरी सिस्टम चांगली होते आणि वजन देखील कमी होते.
ऐक्रोयोगा- घरच्या घरी तुम्ही ऐक्रोयोगा करू शकता. ऐक्रोयोगा हा ऐक्रोबेटिक्सचा एक प्रकार आहे.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
कमी वजन करण्यासाठी प्या भरपूर पाणी
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.
Weight Loss Drink : वजन कमी करण्यासाठी दररोज प्या 1 ग्लास काकडीचा ज्यूस
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )