(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Promise Day 2021 : नातं अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या जोडीदाराला द्या 'ही' वचनं
व्हॅलेंटाईन वीकमध्ये 11 फेब्रुवारी हा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला मी तुला आजन्म साथ देईल, संकटात तुझ्यासोबत राहीन असे वचन दिले जाते.
Happy Promise Day 2021 : प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु आहे. आज या वीकमधील पाचवा दिवस आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये 11 फेब्रुवारी हा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करण्यात येतो. या अगोदर वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे, टेडी डे साजरा करण्यात येतो.
आजच्या दिवशी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला मी तुला आजन्म साथ देईल, संकटात तुझ्यासोबत राहीन असे वचन दिले जाते. अशी वचने दिल्याने नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी पाठबळ देतात.
भांडण न करण्याचे वचन
एखादे नाते कमजोर करण्यासाठी भांडणाचे मोठे योगदान असते. छोटी छोटी भांडणं चांगली मानली जातात कारण यामुळे दोघांतील प्रेम अजूनच वाढते. पण ही भांडणं जेव्हा वाढू लागतात तेव्हा मात्र ती नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनतात. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला भांडण न करण्याचे वचन देऊ शकता. तसेच कायम समजून घेण्याचे वचन देता येईल. त्यामुळे तुमचे नाते अधिकच मजबूत बनेल.
खोटे न बोलण्याचे वचन
एकदा कोणत्या नात्यावरुन किंवा व्यक्तीवरुन विश्वास उडाला तर पुन्हा ते नातं पहिल्यासारखं बनवणं फार कठीण होतं. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटे बोलू नका. कोणतेही संबंध हे विश्वासावर आधारित असतात. आपण आपल्या जोडीदाराचा विश्वास मोडत तर नाहीत ना हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जोडीदार तुमच्याकडून नेहमी सत्याची अपेक्षा करतो. जर आपण खोटे बोलल्याचे पकडले गेले तर आपले संबंध खराब होतील. त्यामुळे आजच्या दिवशी खोटे न बोलण्याचे वचन देता येईल.
पुरेसा वेळ देण्याचे वचन
कोणत्याही नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचे आहे. अनेक नाती ही वेळ न दिल्यामुळे तुटतात. सध्याच्या दैनंदिन जीवनात घर- ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना निवांत वेळ देणे शक्य होत नाही. पण किमान आठवड्यातील एक दिवस तरी आपल्या नात्यासाठी राखून ठेवा ज्यामुळे तुमचे नाते टिकण्यास मदत होईल. आज तुम्ही वेळ देण्याचे वचन देऊन देखील पार्टनरला इंप्रेस करू शकता.
एकमेकांना स्पेस देण्याचे वचन
आपल्या जोडीदाराला त्याची स्पेस द्या, पूर्णवेळ दोघे एकत्रच असतात यामध्ये यामध्ये निदान दिवसातले तीन ते चार तास स्वतःसाठी घालवणे गरजेचा आहे. स्पेस न दिल्यास नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे. एखादे नातं तेव्हाच मजबूत होतं जेव्हा दोघंही व्यक्ती एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात. तसंच एकमेकांचा आदर करतात. यामुळेच नातं आणखी दृढ होत जातं.
Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?