Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
Bajarang Sonawane : बीडचे खासदार बंजरंग सोनवणे यांनी वाल्मिक कराडला जामीन आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, असा टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची सदनिका घोटाळा प्रकरणातील शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु आहे. याचवेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळं धनंजय मुंडे यांचं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कमबॅक होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दुसरीकडे वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन अर्ज फेटाळण्यात आला, यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ना वाल्मिक कराडला जामीन मिळणार, ना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार अशी टीका बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
Bajarang Sonawane on Dhananjay Munde : बजरंग सोनवणे काय म्हणाले?
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात येणार नाहीत. मी ठाम पणे सांगतो मंत्रिमंडळात त्यांना घेणार नाहीत, त्यांना कुणीही घेणार नाहीत, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. वाल्मिक कराड याला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना कोणीही मंत्रिमंडळात घेणार नाही, अशी टोला देखील बजरंग सोनवणे यांनी लगावला.
धनंजय मुंडे यांनी मंत्री होण्यासाठी अमेरिकेला जावं
धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात विचारलं असता सोनवणे यांनी ते त्यांच्या पक्षाला आंधारात ठेऊन, मुंबईला चाललो म्हणून दिल्लीला आले आहेत. ते त्यांच्याच पक्षातील नेत्यांना ते अंधारात ठेवतात, अशी टीका सोनवणे यांनी केली.
धनंजय मंडे मंत्री होणारच नाहीत, जर तर वर मी बोलणार नाही. मी जबाबदारीने सांगतोय. आता ते महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात पुन्हा दिसणार नाही. त्यांना मंत्री व्हायचं असेल तर अमेरिकेला जावं लागेल, असा टोला देखील बजरंग सोनवणे यांनी लगावला.
वाल्मिक कराड याला जामीन होणार नाही, यांना पण मंत्रिपद मिळणार नाही. दोन गोष्टी पक्क्या आहेत, वाल्मिक कराडला जामीन आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, असं बजरंग सोनवणे म्हणाले.
वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला
सरपंच संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.संतोष देशमुख खून खटल्यात बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर वाल्मीक कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सुनावणीअंती सदर प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याने सदर जामीन अर्ज मागे घेता की आदेश पारित करावा, असे कराडच्या वकिलांना केली. वकिलांनी आदेश करण्याची विनंती केली असता उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला.























