एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Teddy Day 2021: प्रेमीयुगलांसाठी खास आहे टेडी-डे, आपल्या जोडीदाराला असं करा इम्प्रेस

Teddy Day 2021: प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा व्हॅलेंटाईन सप्ताह सध्या सुरु आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो.

Teddy Day 2021: प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा व्हॅलेंटाईन सप्ताह सध्या सुरु आहे. आज या सप्ताहातील चौथा दिवस आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. 10 फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमीयुगल एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात. खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो. कारण आज प्रेमी आपल्या प्रेयसीला टेडीबिअर गिफ्ट करतो. बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे टेडी सध्या विक्रीसाठी आले असून टेडीची मोठी उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते.

टेडी-डे ला बनवा खास आपल्या पार्टनरला खूश करण्यासाठी टेडीनं आपल्या घराला सजवू शकता. बाजारात अनेक रंगांचे टेडी उपलब्ध आहेत. यात लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांचे टेडी सर्वात आवडते असतात. लाल रंग प्रेमाचं प्रतिक मानला जातो, त्यामुळं लाल रंगाचा टेडी आपण आपल्या प्रिय व्यक्तिला देऊ शकता. तर गुलाबी रंग खासकरुन मुलींना खूप आवडतो, त्यामुळं त्या रंगाचा टेडी देखील आपण भेट करु शकता.

टेडीची सुरूवात अमेरिकेतून झाली

टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियानातील सीमा वाद समोर आला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट होते. रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियानातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी मोकळ्या वेळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली.या वेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. अस्वल तळमळत होता. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला त्रासातून आराम मिळू शकेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा होती. या घटनेशी संबंधित एक व्यंगचित्र एका नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन यांनी बनविलेले अस्वल लोकांना आवडले.अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. त्याचे नाव रुझवेल्ट असे ठेवले गेले. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते.राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली. तेव्हापासून हे नाव लोकप्रिय झाले आहे. जगातील पहिले टेडी बिअर अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे. 1984 मध्ये ठेवले आहे.

World Chocolate Day 2020 | चॉकलेटचा इतिहास काय? चॉकलेट खाणं फायद्याचं का आहे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget