Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. यानंतर मला काहीही झालं तर आज ज्यांची ज्यांची नाव मी घेतली ते लोक जबाबदार असतील, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे प्रकरण उघडकीला आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर सक्तीचं राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी आशा मला आहे. ऍड उके नावाच्या व्यक्तीने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनी देखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं होते हे सर्वांनी पाहिले.























