खण इन ट्रेन्ड! जुन्या पध्दतीच्या खणाच्या साड्या आता नवीन रंगाढंगात
खणाची साडी हा महाराष्ट्राच्या परंपरेचा एक भाग आहे. ही जुनी परंपरा आता नव्या रंगाढंगात बाजारात आली असून ती महिलावर्गाला भुरळ घालत आहे. (Handloom Cotton Khun Fabrics From Maharashtra in Trend)
Handloom Cotton Khun Fabrics: 'जुनं ते सोनं' ही म्हण आपण कायमच ऐकत आलोय. अनेकदा त्या म्हणीचा अनुभव आपण सगळेच आपल्या रोजच्या आयुष्यात घेत असतोच. जुन्या वस्तू, आठवणी, परंपरा या नेहमीच मनाचा ठाव घेतात. जुनी फॅशन काही वर्षांनी नवीन प्रकारे परत येत असते. सध्या ही म्हण उत्तम प्रकारे लागू होतीये ती महिला विश्वात.
साडी म्हणजे स्त्रियांच्या मनाचा हळवा कोपरा. कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असलं तरी बाजारातील प्रत्येक नवीन साडी या महिला वर्गाला खुणावतेच. प्रत्येक दोन चार महिन्यांनी नाविन्यपूर्ण साड्या बाजारात येत असतात अन महिलांना त्याची भुरळ पडते. एखादी नवीन वस्तू , प्रकार वापरुन पाहण्याची आवड सर्वांना असते, त्यातही काही खास ट्रेन्डला महिलांची पसंती असते.
एखादी नवीन फॅशन आली की आपणही ती वापरुन पहावी हा मोह प्रत्येक महिलेला असतो. त्यातचं अश्या जुन्या पद्धतीच्या, आकर्षक साडीचा मोह टाळणे अटळचं!
Republic Day 2021 Parade : महाराष्ट्राचं वैभव देश पाहणार, यंदा राजपथावर संत परंपरेवर आधारित चित्ररथ!
राज्यातील महिलावर्गात सध्या एका जुन्या पद्धतीच्या साडीची क्रेझ निर्माण होऊन मागणी वाढलीये. जुनी फॅशन थोड्या हटके पद्धतीने परत येत असते आणि फॅशन ट्रेन्ड म्हणून सुपरहिट होते. त्यामुळेच सध्या महिला वर्गाचा कल वाढलाय तो जुन्या प्रकारच्या पण नवीन रुपात आलेल्या खण साडीकडे. यापूर्वी खणाच्या चोळ्या पारंपरिक वस्त्र म्हणून घातल्या जायच्या. काळानुसार त्यावर पडदा पडत गेला. पण आता पुन्हा नव्याने बाजारपेठा सजल्यात त्या या नवीन पध्दतीच्या खण साडीने. या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्ण खणाच्या चोळी सारख्या दिसतात.
या साड्या नथ, सरस्वती, स्वस्तिक अश्या अनेक पॅटर्न आणि विविध रंगात उपलब्ध असल्याने महिलावर्गाची खास पसंती ठरतायंत. खण साडी अन त्यावर ट्रेन्डिंग ऑक्सिडाईज दागिन्यांची सांगड महिलांवर अगदी शोभून दिसते, त्यांचे सौंदर्य अधिकचे खुलवतात. अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी सुद्धा त्यांच्या काही खास कार्यक्रमात हा खास खण साडीचा पारंपरिक लुक परिधान केलेला दिसतो. खण साडी अन त्यावर मॅचिंग खणाचा मास्क सध्या हिट ठरतोय.
माहिम दर्ग्याची 120 वर्षाची परंपरा यंदा खंडीत
खण साडी त्यावर तशीच पारंपरिक नथ, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर चंद्रकोर अशी मराठमोळी वेशभूषा कोणाला आवडली नाही म्हणजे नवलंच! त्यामुळेच हा ट्रेन्डिंग लूक सणावाराला महिलावर्गाचं खास आकर्षण ठरतोय. या खण साड्या बाजारात अगदी रास्त दरात उपलब्ध आहेत. पाचशे ते पाच हजार रुपये किंमती असलेल्या या साड्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. याच साड्यांपासून लहान मुलींसाठी शिवलेले फ्रॉक, कुर्ते हे ही सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक वयातील महिलांना या साड्या तेवढ्याचं शोभून दिसतात.
नवनवीन पध्दतीच्या साड्या कायमचं ट्रेन्ड होत असतात. पण खण साडीचा तोरा काही वेगळाचं!
Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त