एक्स्प्लोर

Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त

Tulsi Vivah 2020: भारतीय संस्कृतीत साधारणत: कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. तुळशीला मिळालेल्या एका वरामुळे तिचा विवाह भगवान विष्णूशी लावला जातो. त्यांनंतरच सर्व मुहूर्तांची सुरुवात होते असे मानले जाते.

Tulsi Vivah 2020: कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची लगबग सुरु होते. कार्तिक पौर्णिमेपर्यंत अर्थात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या काळात तुळशीचा विवाह करता येतो. परंतु प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. या नंतरच लग्नाच्या मुहूर्तांनाही सुरुवात होते.

तुळशी विवाहाची अख्यायिका जालंदर नावाच्या असुर हा देवलोकांना छळत होता. त्यांच्या कृत्याने सगळेच देव आणि ऋषीमुनी हैराण झाले होते. पण त्याचा पराभव करणे देवांना जमत नव्हते कारण जालंदरची पत्नी वृंदा ही अतिशय पुण्यवान होती. तिच्या पुण्याईने जालंदरचा नाश करणे देवांनाही अशक्य बनले होते. अशा वेळी वृंदेची पवित्रता भ्रष्ट केल्याशिवाय जालंदरचा नाश करणे अशक्य आहे या विचारापर्यंत देवलोक पोहचले. एकदा जालंदर नसताना त्याचे रुप घेऊन विष्णूनी वृंदाचे सत्व हरण केले. त्यामुळे तिची पवित्रता नष्ट झाली आणि जालंदरचा पराभव झाला. वृंदाने देहत्याग करताना भगवान विष्णूंना दगड म्हणजेच शाळिग्राम होण्याचा शाप दिला. भगवान विष्णूनी वृंदेच्या पतिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला. पुढे सती वृंदा हिच तुळशी रूपाने प्रगट झाली.

वृंदेचे महात्म वाढावे म्हणून विष्णूंनी तुळशीसोबत लग्न केले. तेव्हापासून आपल्या समाजात तुळशी विवाह करण्याची परंपरा प्रचलित असल्याचे सांगितले जाते आणि या घटनेची आठवण म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला भगवान विष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीला विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळस अर्पण केल्याशिवाय विष्णूची पूजा पूर्ण होत नाही असेही सांगितले जाते. तुळशीच्या मंजिरीची पूजा केली अथवा तिला नमस्कार केला असता तो देवांपर्यंत पोहोचतो असा समज आहे.

अंगणात तुळसीचे रोप असणे म्हणजे पवित्र मानले जाते. तुळशीमुळे हवा शुध्द राहून आरोग्यही उत्तम राहते. आयुर्वेदात तुळशीच्या पानांचा वापराचे अनेक फायदे सांगितले आहेत.

कार्तिकी एकादशीपासून मंगलकार्यांची सुरुवात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन फुलांनी सुशोभित केले जाते. त्याच्या मुळाशी चिंचा, सिताफळे, बोरं आणि आवळे ठेवली जातात. मांडवाच्या रुपात त्यास उसाच्या खोपटांनी सजवले जाते. तुळसीच्या मुळापाशी बाळकृष्णाची मुर्ती ठेऊन मंगलाष्टके म्हणून त्याचा तुळशीसोबत विवाह लावला जातो. त्यावेळी तुळशीचे कन्यादान केले जाते. नंतर तिची आरतीही केली जाते. आपल्या घरच्या कन्येला श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा हेतू त्यामागे असतो. त्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाते.

कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशीदिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो अशी अख्यायिका आहे. कार्तिकी एकादशीपासून घरातील सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. या मुहूर्तानंतरच लग्नांच्या मुहूर्तांची सुरुवात होते.

कार्तिकी एकादशी : बुधवार, 25 नोव्हेंबर 2020.

एकादशी प्रारंभ : मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 रोजी मध्यरात्री 02 वाजून 46 मिनिटे.

एकादशी समाप्ती : गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 05 वाजून 10 मिनिटे.

द्वादशी प्रारंभ : गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे 05 वाजून 11 मिनिटे.

द्वादशी समाप्ती : शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 07 वाजून 46 मिनिटे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
चुकीची जीवनशैली देते कर्करोगास आमंत्रण, Cancer चे जोखीम घटक कोणते? 
चुकीची जीवनशैली देते कर्करोगास आमंत्रण, Cancer चे जोखीम घटक कोणते? 
Health: मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध: अल्झायमर, मधुमेह आणि सीजीएम यांच्‍यामधील समान दुवा
मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध: अल्झायमर, मधुमेह आणि सीजीएम यांच्‍यामधील समान दुवा
न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे काय? मेंदू अन् मज्जासंस्थावर होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं..
न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे काय? मेंदू अन् मज्जासंस्थावर होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं..

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Railway UTS APP: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
Maharashtra Live blog updates: अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Embed widget