Hair Care Tips : केस धुतल्यानंतर लगेच 'हे' काम करा; ड्रायरशिवाय केस कोरडे होतील
Hair Care Tips : जर तुम्हाला ड्रायर न वापरता तुमचे केस सुकवायचे असतील तर तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता.
Hair Care Tips : हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. वातावरणात थंडावा असल्या कारणाने अनेकांना या थंडीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत लांब केस असलेल्या मुलींचा त्रास वाढला आहे. खरंतर या ऋतूत केस धुणं फार अवघड काम असतं. जेव्हा केस सुकवण्यासाठी ड्रायर नसतो तेव्हा हे काम अधिक कठीण होतं. ड्रायरच्या मदतीने केस लवकर सुकतात आणि सर्दीपासून बचाव होतो. पण, जर तुमच्याकडे ड्रायर नसेल तर अशा वेळी काय कराल? हिवाळ्यात ड्रायर न वापरता केस कसे सुकवायचे या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा
जर तुम्हाला ड्रायर न वापरता तुमचे केस सुकवायचे असतील तर तुम्ही मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस लवकर कोरडे होतातच पण या टॉवेलमुळे तुमचे केस लवकर खराबही होत नाहीत. मायक्रोफायबर टॉवेलने केस सुकवण्यासाठी त्यात केस चांगले गुंडाळा आणि हलक्या हाताने टॉवेलने केस हळूहळू वाळवा.
टी-शर्ट वापरा केस लवकर सुकवण्यासाठी तुम्ही कॉटन टी-शर्ट वापरू शकता. इतर कोणत्याही फॅब्रिकच्या टी-शर्टने तुमचे केस लवकर सुकणार नाहीत. टी-शर्टऐवजी तुम्ही कोणतेही सुती कापड वापरू शकता. सुती कपडे पाणी अधिक चांगले आणि लवकर शोषून घेतात आणि त्यामुळे केसांना कोणतीही हानी होत नाही. आहे.
रुंद दातांचा कंगवा वापरा
शॅम्पू केल्यानंतर केस ओले सोडण्याऐवजी जाड कंगव्याने केस विंचरा. यामुळे केसांमधील अतिरिक्त पाणी निघून जाते आणि केस लवकर सुकतात. याशिवाय शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर लावायला विसरू नका. कंडिशनर लावल्याने केसांना पोषण मिळते. त्यामुळे केस लवकर सुकतात.
केस धुतल्यानंतर लगेच 'हे' काम करा
अंघोळ केल्यानंतर बहुतेक लोक ओल्या केसांनी बाथरूममधून बाहेर पडतात. असे केल्याने केस सुकायला जास्त वेळ लागतो. त्याऐवजी, बाथरूममध्येच केसांमधील पाणी पिळून घ्या. यानंतर, बाहेर येऊन केस चांगले कोरडे करा. केस सुकविण्यासाठी नेहमी योग्य ब्रश निवडा. ओल्या केसांवर फक्त खरखरीत दातांचा कंगवा वापरा. ओले केस अधिक कमकुवत असल्यामुळे अशा वेळी कंगवा केल्याने केस गळण्याचा धोका वाढतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या