एक्स्प्लोर
डाएटकट्टा | कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाल्ल्याने आजारांवर मात | डॉ. दीक्षित
दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त साडेतीन महिन्यात होतो, असं सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ‘माझा कट्टा’वर डाएटगप्पा मारल्या.
मुंबई | बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त साडेतीन महिन्यात होतो, असं सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी ‘माझा कट्टा’वर डाएटगप्पा मारल्या.
दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतलं पाहिजे आणि कमी जेवण्यापेक्षा कमी वेळा जेवणं गरजेचं आहे असंही डॉ. दीक्षित म्हणाले. दोनवेळा जेवतानाही ते जास्तीत जास्त 55 मिनिटांमध्ये संपवणं गरजेचं आहे. हा डाएटप्लॅन फॉलो केल्यास वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, रक्तातील तीन महिन्यातील कळणारं साखरेचं प्रमाण कमी होईल आणि फास्टिंग शुगरही कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एकदा जेवतो तो योगी, दोनवेळा जेवतो तो भोगी आणि तीनवेळा जेवतो तो रोगी अशी संतांची शिकवण आहे, याचाही दाखला त्यांनी दिला. आहारात हे बदल केल्यामुळे वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल असा विश्वास त्यांनी कट्ट्यावर व्यक्त केला.
आपण समोर पदार्थ दिसला की खातो. भूक लागलेली नसतानाही खाल्ल्याने आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असल्याचं त्यांनी कट्ट्यावर सांगितलं. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने या अनेक आजारांना आळा बसण्यास मदत होते असंही त्यांनी म्हटलं आहे.
आहारामध्ये साखर, मध, गूळ यांचं प्रमाण जेवढं कमी ठेवाल तितकाच आरोग्याला फायदा होईल. शाकाहारी लोकांनी आहारात प्रथिनं म्हणजेच प्रोटिन्सचा आहारात जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे. त्याचाही शरीराला मोठा फायदा असल्याचं डॉ. दीक्षितांनी कट्ट्यावर सांगितलं. यात मोड आलेली कडधान्य, डाळ, सोयाबीन, शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला प्रथिनांचा मुबलक पुरवठा होतो. दरम्यान दोन जेवणांमध्ये पाणी, घरात बनवलेलं ताक, आवडत असल्यास ग्रीन टी किंवा ब्लॅक टी, 25 टक्के दूध 75 टक्के पाण्यात घालून त्याचा पातळ चहा, नारळपाणी, तसंच एखादा टोमॅटोही खाता येईल, ज्याने शरीराला फायदा होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement