Bees : डंख मारल्यानंतर मधमाश्या खरंच मरतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण
Bees : जगभरात मधमाश्यांच्या सुमारे वीस हजार प्रजाती आहेत, परंतु सर्वच मधमाश्या डंख मारत नाहीत.
Bees : परिसंस्थेतील प्रत्येक लहान-मोठ्या प्राण्यांमध्ये काही गुण आहेत, मधमाश्या (Bees) देखील त्यापैकी एक आहेत. मधमाशांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती पर्यावरणावर परिणाम करते, त्याबरोबरच मानवी जीवनावर देखील परिणाम होतो. मधमाश्या सहसा कोणालाही त्रास देत नाहीत. परंतु, जर त्यांना त्रास दिला तर तर त्या देखील डंख मारू शकतात. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की मधमाशीने एखाद्याला डंख मारला तर मधमाशी देखील स्वतःच मरते. पण या माहितीत फारसं तथ्य आहे का? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
'या' प्रजातीचा डंख प्रभावी नसतो
जगभरात मधमाश्यांच्या सुमारे वीस हजार प्रजाती आहेत, परंतु सर्वच मधमाशा डंख मारत नाहीत. 'स्टिंगलेस मधमाश्या' नावाच्या प्रजातीचे डंख (ट्रायब मेलिपोनिनी) किंवा 'मायनिंग बीज' इतके लहान असतात की ते प्रभावीही नसतात.
मधमाश्यांवर अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधमाश्या अनेकदा मानव किंवा इतर सस्तन प्राण्यांना डंख मारल्यानंतर स्वतःच मरतात. याचे कारण त्यांच्या नांगीचा पोत आहे. मधमाश्यांच्या डंखाने मागच्या बाजूला वाढलेले काटे असतात. मधमाश्या जेव्हा एखाद्याच्या शरीरात डंख मारतात तेव्हा त्वचेच्या आत गेल्यावर त्यांना आहे त्या स्थितीत परत येणं शक्य नसतं. अशा परिस्थितीत जेव्हा मधमाशी त्वचेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करते, तेव्हा डंखासह तिचे पुनरुत्पादक अवयव देखील शरीरापासून तुटतात.
पुनरुत्पादक अवयव आणि पोटाच्या अवयवांशिवाय, मधमाशी फक्त काही तास जगू शकते. त्यानंतर ती अवयव निकामी झाल्यामुळे मरते. अशा प्रकारे एखाद्याला डंख मारल्याने मधमाशी देखील मरते. पण सगळ्याच मधमाश्या अशा नसतात. मधमाश्यांच्या सुमारे 10 प्रजाती देखील आहेत ज्या इतर कीटक किंवा कोळी डंख मारल्यानंतरही जिवंत राहतात.
काही प्रजाती डंख मारूनही मरत नाहीत
मधमाशांचे (Bees) डंख वेगवेगळ्या पोतांचे असतात. काही मधमाशांचा डंख गुळगुळीत असतो. अशा परिस्थितीत ती डंख मारूनही मारत नाही. उदाहरणार्थ, भोंग्याचा डंख देखील गुळगुळीत असतो. त्यामुळे अनेकदा डंख मारूनही ते जिवंत राहतात.
मादी मधमाश्या डंख मारतात
शास्त्रज्ञांच्या मते, फक्त मादी मधमाश्याच डंख मारतात. त्यांच्या पोळ्यात नरांपेक्षा माद्या जास्त असतात. स्त्री आणि पुरुष यांचे गुणोत्तर 1:5 आहे. आणि त्यामुळे मादी मधमाश्या जास्त प्रमाणात डंख मारतात.
महत्त्वाच्या बातम्या :